Mahashivratri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2025) दिवशी पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी व्यक्ती खऱ्या मनाने भोलेनाथाची पूजा करतात. तसेच, जलाभिषेक करतात. या दिवशी उपवास, ध्यान आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं. तसेच, विविध विधींचं पालन केलं जातं.
शिवलिंगावर जल चढवताना काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त नेमका कोणता असणार आहे? तसेच, पूजा, विधी काय असतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त (Mahashivratri Shubh Muhurta 2025)
2025 या वर्षात महाशिवरात्रीचा उत्सव 26 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. तरस या दिवशी सकाळी 11.08 वाजा पूजेस प्रारंभ होणार आहे. तर, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजून 54 मिनीटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे. या दिवशी जलाभिषेकाचा देखील शुभ मुहूर्त आहे.
महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Mahashivratri Shubh Puja Muhurta 2025)
महाशिवरात्रीची पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 06.43 पासून सुरु होऊन रात्री 09.47 पर्यंत असणार आहे.
द्वितीय पूजेचा मुहूर्त 26 फेब्रुवारी : रात्री 09.47 ते मध्यरात्री 12.51 वाजेपर्यंत
तृतीय पूजेचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारी : मध्यरात्री 12.51 ते मध्यरात्री 03.55 वाजेपर्यंत
चतुर्थ पूजेचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारी : पहाटे 03.55 ते 06.59 पर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :