Maharashtra Holika Dahan Muhurat : हिंदू धर्मशास्त्रानुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा (Holi 2025) सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी रंगाची उधळण केली जाते. तसेच, होलिका दहनाच्या (Holika Dahan) दिवशी मनातील सगळी जळमटं दूर सारुन नवीन वाटचालीस सुरुवात करतात. खरंतर, वाईटावर चांगल्याचं प्रतीक म्हणून होळी या सणाकडे पाहिलं जातं. यासाठीच होळीचा शुभ मुहूर्त पूजा विधी आणि तिथी नेमकी काय असणार आहे ते जाणून घेऊयात.


होलिका दहन विधी 


पौर्णिमा तिथीची सुरुवात : 13 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपासून सुरु होणार आहे. 


पौर्णिमा तिथी समाप्ती : 14 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटापर्यंत असणार आहे. 


पौर्णिमा तिथीचा उदय आणि मोठा अवधी हा 13 मार्चला असल्याने यंदा होलिका दहनही 13 मार्चला केले जाईल आणि धुलिवंदनही दुसऱ्या दिवशी 14 मार्चला साजरे होईल.


होलिका दहनाचा शुभ मुहूर्त


13 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजून 36 मिनिटांपासून ते या दिवशी रात्री 11 वाजून 29 मिनिटांपर्यंत भद्रा काळ असेल. या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च 2024  च्या रात्री 11 वाजून 30 मिनिटांपासून ते रात्री 1 वाजून 04 मिनिटांपर्यंत असेल.


होळी पूजनाचा शुभ मुहूर्त 


यावर्षी पंचांगानुसार, 13 मार्च 2025 ला रात्री 11.26 वाजल्यापासून ते रात्री 12.30 वाजेपर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरुन शेंडीबाहेर असेल असाच हातात धरावा. तसेच, तो नारळ संपूर्ण घरात फिरवून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नीत अर्पण करावा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                          


Shani Gochar 2025 : होळीनंतर 'या' 3 राशींचं नशीब पालटणार; अचानक मिळणार मोठी संधी, पैसा चुंबकासारखा हातात खेळणार