Mahalakshmi Rajyog: माणसाच्या आयुष्यात असा एक योग नक्कीच येतो, ज्यामुळे त्याचं नशीब पूर्णपणे पालटते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा माणसाच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषींच्या मते, आज 11 जूनचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज कमला एकादशी आहे, आणि ग्रह-ताऱ्यांची स्थिती पाहता चंद्राच्या संक्रमणामुळे महालक्ष्मी योग देखील निर्माण झाला. ज्यामुळे 4 राशींना याचा मोठा फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी...

आज अधिक मास एकादशी अन् 'महालक्ष्मी राजयोगाचा' पॉवरफुल संयोग! (Mahalakshmi Rajyog 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, आज 11 जून, 2026 रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे संक्रमण 11 जून रोजी सकाळी 8:17 वाजता होईल. या दिवशी परम एकादशीचे व्रत पाळले जाईल. चंद्र - मंगळ मेष राशीत युती करून महालक्ष्मी योग तयार करतील. त्यामुळे, चंद्राचे हे संक्रमण काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही या राशींविषयी माहिती देणार आहोत.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, 11 जून रोजी मेष राशीत महालक्ष्मी योग तयार झाला आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित परिणाम अनुभवता येऊ शकतात. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. काही लोकांच्या जोडीदारांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत असलेल्यांनाही भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तुमच्या प्रेम जीवनातील प्रणयदेखील वाढू शकतो.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, 11 जून रोजी महालक्ष्मी योग तुमच्या आयु्ष्यातील अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळवून देऊ शकतो. काहींना उत्पन्नात अचानक वाढ किंवा पदोन्नतीचा अनुभव येऊ शकतो. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली, तर चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातही संतुलन दिसून येईल.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, 11 जून रोजी महालक्ष्मी योग सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्य निर्माण करेल. हा योग सिंह राशीच्या लोकांना भाग्याची पूर्ण साथ देऊ शकतो. जर तुम्ही पूर्वी पैसे गुंतवले असतील, तर तुम्हाला नफा मिळू शकतो. या राशीत जन्मलेले काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यातही यशस्वी होतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असेल.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, 11 जून रोजी महालक्ष्मी योग तयार झाला आहे. महालक्ष्मी योगाची निर्मिती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना अपेक्षित पगाराच्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित व्यवसायातूनही नफा होण्याची शक्यता आहे. विक्री, माध्यम आणि चित्रपट उद्योगात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते.

हेही वाचा

Adhik Maas Amavasya 2026: 15 जूनच्या अधिक मास अमावस्येला 3 वर्षांनी पॉवरफुल योग! 5 राशींची पाचही बोटं तुपात, भोलेनाथांचं प्रचंड पाठबळ, तिथी, महत्त्व, शुभ योग जाणून घ्या...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)