Maghi Ganesh Jayanti 2026 : माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला केल्या जाणाऱ्या जयंतीला माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) म्हणतात. माघी गणेश जयंती ही गणरायाच्या जन्मोत्सवाची अत्यंत शुभ तिथी मानली जाते. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा, उपवास आणि विशिष्ट उपाय केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. विशेष म्हणजे राशीनुसार उपाय केल्यास चांगलं फळ मिळते.
माघी गणेश जयंतीला राशीनुसार करा 'हे' उपाय :
मेष रास (Aries Horoscope)
उपाय: गणपतीला लाल फुले अर्पण करा.फायदा: आत्मविश्वास वाढेल, कामातील अडथळे दूर होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करून “ॐ गं गणपतये नमः” जप करा.फायदा: आर्थिक स्थैर्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
उपाय: बुधवारी किंवा माघी जयंतीला गणपती अथर्वशीर्ष पठण करा.फायदा: बुद्धी, वाणी आणि निर्णयक्षमता मजबूत होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
उपाय: पांढऱ्या मिठाईचा (मोदक/पेढा) नैवेद्य दाखवा.फायदा: मानसिक शांतता आणि कौटुंबिक सौख्य वाढेल.
सिंह रास (Leo Horoscope)
उपाय: गणपतीला सिंदूर अर्पण करून दिवा लावा.फायदा: मान-सन्मान, नेतृत्वगुण आणि करिअरमध्ये प्रगती.
कन्या रास (Virgo Horoscope)
उपाय: हिरव्या रंगाच्या वस्तू (दुर्वा/वस्त्र) अर्पण करा.फायदा: आरोग्य सुधारेल, कामातील अचूकता वाढेल.
तूळ रास (Libra Horoscope)
उपाय: गणपतीसमोर तूपाचा दिवा लावून ध्यान करा.फायदा: नातेसंबंधात समतोल आणि आर्थिक निर्णयात यश.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
उपाय: लाल मोदकांचा नैवेद्य दाखवा व संकटमोचन गणेश स्तोत्र पठण करा.फायदा: संकटे कमी होतील, धैर्य वाढेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
उपाय: गणपतीला केळी किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य.फायदा: शिक्षण, प्रवास आणि भाग्यात वाढ.
मकर रास (Capricorn Horoscope)
उपाय: काळ्या तीळाचा लाडू किंवा दुर्वा अर्पण करा.फायदा: कामातील स्थिरता, जबाबदाऱ्या सहज पार पडतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
उपाय: गणपतीला निळी/हिरवी फुले अर्पण करून सेवा-दान करा.फायदा: नव्या संधी, सामाजिक मान्यता.
मीन रास (Pisces Horoscope)
उपाय: गूळ-नारळाचा नैवेद्य व मनोभावे प्रार्थना.फायदा: अध्यात्मिक प्रगती, मनोकामना पूर्ण होण्यास मदत.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
