Shani Gochar 2024 : नवीन वर्ष (New Year 2024) काही दिवसांतच सुरू होणार आहे. नववर्षात अनेक ग्रह आपली स्थिती बदलतील. ग्रहांच्या बदलत्या हालचालींचा परिणाम मानवी जीवनावरही होतो. या ग्रहांमध्ये शनीचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सध्या, शनि (Shani) स्वतःच्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे आणि येत्या नवीन वर्षात, म्हणजेच 2024 मध्ये देखील शनि कुंभ राशीत असेल, ज्यामुळे सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) परिणाम होईल.


शनिदेव 2024 मध्ये कुंभ राशीमध्ये बसून आपली स्थिती बदलताना दिसतील.शनीच्या प्रभावानुसार 2024 हे वर्ष कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असेल? जाणून घेऊया


मेष रास (Aries)


मेष राशीचे लोक 25 डिसेंबरपासून धनवान होतील, शुक्र त्यांच्यावर धनाचा वर्षाव करेल. मेष राशीच्या लोकांसाठी 2024 हे नवीन वर्ष खूप शुभ मानलं जात आहे. येत्या नवीन वर्षात या राशीच्या लोकांवर शनिदेव कृपा करतील. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल, तर विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. जीवनात काही समस्या असणं सामान्य आहे. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांवर 2024 मध्ये शनिदेवाची कृपा असेल. येत्या वर्षात तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा असेल. तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडणे आवश्यक आहे. प्रेम जीवनात चढ-उतार येतील. तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत जाईल. तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान असेल. करिअरमध्ये येणाऱ्या अनेक समस्या संपुष्टात येऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. व्यवसायिकांनाही चांगला गुंतवणूकदार मिळू शकतो.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी येणारं नवीन वर्ष शुभ मानलं जात आहे. येत्या वर्षात कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते. वाढत्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमचं दार ठोठावतील. कुटुंबात सुख-समृद्धीचं वातावरण राहील. कठीण प्रसंग येईल तेव्हा कुटुंब आणि मित्र तुम्हाला मदत करतील. येत्या वर्षात तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो, तुम्हाला चांगला नफा मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : नववर्ष 2024 मध्ये शनि चालणार वक्री चाल; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ, येणार चांगले दिवस