Lucky Zodiac Signs On 8 February 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारीचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, सूर्यदेवाचा देखील दिवस आहे. त्यानुसार, उद्या रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी ठरणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आपल्या कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. ग्रहांची स्थिती देखील अनुकूल असल्या कारणाने तुमच्यावर कोणतं संकट ओढावणार नाही. त्यामुळे निश्चिंत राहा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, तुमच्या मार्गातील अडथळे हळुहळू दूर होतील. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. मुलांना देखील त्यांच्या आवडीप्रमाणे गोष्टी करायला मिळतील. तुम्हाला मानसिक शांती लाभेल. कर्जाचं डोंगर तुमच्यावर नसणार आहे. फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. 

Continues below advertisement

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी रविवारचा दिवस शुभकारक असणार आहे. या कालावधीत तुम्ही घेतलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हळुहळू दूर होतील. लवकरच धार्मिक यात्रेत सहभागी होण्याचे योग जुळून येणार आहेतच. मित्र-मैत्रीणींचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांची सर्व रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. अनेक नवीन योजना राबवाल. मुलांच्या कलागुणांना देखील चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, मानसिक शांतीसाठी तुम्हाला वेळेत झोप घेण्याची गरज आहे. नवीन गोष्टींचा स्वीकार कराल. घरात आनंदी वातावरण असेल. प्रवासाचे योग आहेत. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांनी सर्व नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. प्रॅक्टीकल गोष्टींपेक्षा तुम्ही भावनात्मक विचारांना प्राधान्य द्याल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, लवकरच तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. तुमच्या वाणीत मधुरता जाणवेल. मित्रांचा सपोर्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. 

हे ही वाचा :                                                                       

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Laxmi Narayan Yog : 2026 वर्षातला सर्वात शक्तिशाली योग; लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; पैसा, नोकरी, करिअरला चार चॉंद