Lucky Zodiac Signs On 5 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक राशीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. उद्या 5 जानेवारी 2026 चा दिवस आहे. या दिवशी सोमवार असल्या कारणाने हा दिवस भगवान शंकराला आपण समर्पित करतो.  तसेच, या दिवशी भगवान शंकराची (Lord Shiva)  पूजा करतात. या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार देखील अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते पाहूयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मात्र, हा प्रवास निवांत असेल. तसेच, लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळेल. धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक राहील. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला जास्त लाभ मिळेल. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, तुमच्या घरात सकारात्मक वातावरण राहील. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक चांगला असेल. तुम्हाला कोणताच मानसिक ताण जाणवणार नाही. तसेच, समाजातील काही खास व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. नातेसंबंध मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस फार अनुकूल असणार आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तसेच, कामाच्या काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमचं मन फार प्रसन्न असेल. संध्याकाळी तुम्ही धार्मिक कार्यात मग्न व्हाल. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वातावरण मिळेल. तसेच,तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्र परिवाराशी भेटीगाठी वाढतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :     

New Year 2026 : नवीन वर्षात राहू-केतू आणि शनिची वक्रदृष्टी; 'या' 2 राशींच्या हातात पैसा येण्याआधीच जाणार, वर्षभर राहतील कंगाल