Lucky Zodiac Signs On 5 April 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 5 एप्रिलचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, सूर्यदेवाचा देखील दिवस आहे. त्यानुसार, उद्या रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभाचे योग जुळून येतील. तसेच, अनावश्यक तुमचे पैसे खर्च होण्याचीही शक्यता आहे. प्रेमसंबंधात मधुरता जाणवेल. तसेच, तुमच्या जीवनात हळुहळू सुधारणा दिसून येईल. जर घरात वादविवाद होत असतील तर ते वाद हळुहळू मिटतील. तुम्हाला संतान सुख मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत कोणतीच काळजी करण्याची गरज नाही. तसेच, करिअर किंवा व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. तसेच, तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावधान राहण्याची गरज आहे. या कालावधीत तुम्ही हाती घेतलेली कामे पूर्ण करु शकता. तसेच, मित्र परिवाराच्या साथीने नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असेल. तुमच्या आर्थिक स्थिती चांगली भरभराट पाहायला मिळेल. तसेच, अचानक धनलाभही होऊ शकतो. तुमचा मानसिक ताण दूर होईल. नवीन लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. तसेच, तुमची संवादकौशल्य शैली चांगली असेल. त्यामुळे लोक आपसूकच तुमच्याकडे आकर्षित होतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. प्रेमाच्या बाबतीत तुमचा उद्याचा दिवस चांगला जाणार आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Chaturgrahi Rajyog 2026 : मीन राशीत जुळून येतोय 4 ग्रहांचा महासंयोग; 11 एप्रिलला मेष, सिंहसह 'या' राशींनी राहा अलर्ट, हातून 'ही' गोष्ट निसटण्याची शक्यता