Lucky Zodiac Signs On 23 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 23 जानेवारी दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला (Lord Lakshmi) समर्पित आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्याच्या दिवशी वसंत पंचमीचा दिवस आहे. तसेच, लवकरच बुध आणि शुक्र, गुरु ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे उद्या कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ फार शुभकारक असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी सुखकर असेल. धार्मिक तसेच, आध्यात्मिक कार्यात तुमचं मन रमेल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं कौतुक केलं जाईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी उद्याचा दिवस सुखकारक असणार आहे. या काळात तुमच्या वाणीने इतर प्रभावित होतील. तसेच, तुमच्या आर्थिक धनसंपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. इतरांशी तुमची मैत्री चांगली असेल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या कलागुणांचा विकास होईल. तणावापासून मुक्ती मिळेल. तसेच, समाजात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारकअसणा आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी उद्याचा दिवस तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. मात्र, आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नका. सांधेदुखीचा त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

वसंत पंचमीचा दिवस धनु राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या ाकळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. धनसंपत्तीत भरभराट होईल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी वसंत पंचमीचा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी सुवर्णसंधी असेल. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्ही सुरुवात करु शकता. तसेच, तुम्ही जो निर्णय घ्याल त्या बाबतीत तुम्ही ठाम असणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीच चिंता करु नका. फक्त वेळेवर झोप घेणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :                           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Ardha Kendra Yog 2026 : अखेर तो क्षण आलाच! शुक्र-शनिच्या 'अर्धकेंद्र योगा'मुळे धनसंपत्तीत होणार भरभराट; 28 जानेवारीपासून 'या' 3 राशींची होणार कमाई