Lucky Zodiac Signs : उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
Lucky Zodiac Signs On 15 September 2026 : उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर भगवान हनुमानाची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.

Lucky Zodiac Signs On 15 September 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 15 सप्टेंबरचा (September 2026) दिवस आहे. हा दिवस भगवान हनुमानाला (Lord Hanuman) समर्पित आहे. तसेच, उद्या ऋषिपंचमी देखील आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर भगवान हनुमानाची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्साहवर्धक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल आणि रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची चांगली साथ मिळू शकते. करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाची संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी चांगली डील मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल होऊन नात्यातील जवळीक वाढू शकते.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी 15 सप्टेंबरचा दिवस विशेष ठरू शकतो. कामात केलेल्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन मार्ग सापडू शकतो. वरिष्ठ व्यक्ती किंवा प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळाल्याने एखादे महत्त्वाचे काम सोपे होईल.
तूळ रास (Libra Horoscope)
आज तुला राशीच्या व्यक्तींना अनेक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. अचानक एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पैशांशी संबंधित रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबतचा वेळ आनंददायी जाईल आणि वैयक्तिक आयुष्यात समाधान वाढेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस भाग्याची साथ देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीची नवीन संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत असून एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा



















