Lucky Zodiac Signs On 13 September 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 13 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. त्यानुसार, उद्या शनिवारचा दिवस हा शनि देवाला (Shani Dev) समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी तुमच्या गाठीभेटी होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात तुमची समाजातील प्रभावशाली लोकांशी भेटीगाठी होतील. नवीन प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे अनेक संकेत आहेत.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी उद्याचा दिवस फार अनुकूल असणार आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तसेच, पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळेल. मित्र मैत्रीणींचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार पूर्वीपेक्षा वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तसेच, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :