Lucky Zodiac Signs On 12 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक राशीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. उद्या 12 जानेवारी 2026 चा दिवस आहे. या दिवशी सोमवार असल्या कारणाने हा दिवस भगवान शंकराला आपण समर्पित करतो. तसेच, या दिवशी भगवान शंकराची (Lord Shiva)  पूजा करतात. या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार देखील अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते पाहूयात.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली असेल. तसेच, करिअरमध्ये देखील तुम्हाला वेगळे मार्ग उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. 

तूळ रास (Cancer Horoscope)

ग्रहाच्या संक्रमणाने तूळ राशीसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. तसेच, पैशांची देवाण-घेवाण तुम्ही करु शकता. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्ही घराबाहेर पडाल. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. समाजातील काही ज्येष्ठ व्यक्तींबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. नवीन संपर्क वाढतील. तसेच, तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न असेल. कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवेल. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :   

Grah Gochar in January 2026 : सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र ग्रहाचं एकापाठोपाठ संक्रमण; 'या' 5 राशींसाठी नवीन आठवडा आर्थिक भरभराटीचा, लॉटरी लागलीच