Lucky Zodiac Signs 4 January 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, पंचांक योग (Panchank Yog) फार महत्त्वाचा मानला जातो. हा पंचांक योग ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतो. हा योग तेव्हा जुळून येतो जेव्हा दोन ग्रह 72 अंशाच्या अंतरावर असतो. यामुळे फार शुभ योग जुळून येतो. ज्यामुळे सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येतो. 

Continues below advertisement

द्रिक पंचांगानुसार, 4 जानेवारी 2025 रोजी  म्हणजेच उद्या सूर्य आणि शनि मिळून पंचांक योग निर्माण करणार आहे. या पंचांक योगाला फार महत्त्व असणार आहे. कारण हा 2026 वर्षातला पहिला पंचांक योग आहे. आता या योगामुळे कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

या योगाचा सर्वात पहिला परिणाम मेष राशीवर होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान वाढलेला दिसून येईल. तसेच, घरात आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश येईल. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा जास्त चांगली सुधारणा दिसून येईल. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी पंचांक योग रचनात्मक आणि सौभाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक नवीन संधी निर्माण झालेल्या दिसतील. मित्रांबरोबरचे जुने गैरसमज मिटतील. तसेच, तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या दरम्यान तुमचे कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवाराबरोबर सामंजस्य वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील. तसेच, तुम्ही जे कार्य करताय त्यात तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी पंचांक योग लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्ही घेत असलेल्या निर्णयात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

हे ही वाचा :                         

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Makar Sankranti 2026 : सूर्य संक्रमणानंतर मकर, सिंहसह 'या' राशींचं उजळणार भाग्य; तर, 'या' राशींसाठी नवं वर्ष धोकादायक