Lucky Zodiac Signs 20 September 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 20 सप्टेंबरचा दिवस आहे. हा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर शनिदेवाची कृपा असणार आहे. तसेच, कोणत्या राशींचं बॅंक बॅलेन्स वाढणार आहे आणि उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्य जुन्या मित्र मैत्रीणींशी भेटीगाठी होतील. तसेच, मित्राच्या सहकार्याने तुमची सगळी कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. नोकरीत पगारवाढ होण्याची शक्यता आहे. घरात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल. उद्याच्या दिवासात कोणाशीही पैशांचा व्यवहार करु नका.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. एखादी चांगली डील तुमच्या हाताला लागू शकते. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. आर्थिक बाबतीत तुमच्या संपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. तसेच, समाजात तुमची चांगली प्रगती होईल. समाजातील प्रतिष्ठीत लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. वैवाहिक जीवन सुखी असेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, तुमच्या कामात प्रामाणिकपणा दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. भावा-बहिणीतील व्यवहार अधिक दृढ होताना दिसतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती दिसून येईल. नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. तसेच, धन-संपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. आरोग्याच्या बाबतीत कोणतीच तक्रार जाणवणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :