Lord Shiva Favourite Mulank : 'या' जन्मतारखेचे लोक असतात भोलेनाथांना प्रिय; कोणतंही शुभ कार्य करण्याआधी भक्तांना देतात 'हा' छोटासा संकेत
Lord Shiva Favourite Mulank : अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, व्यक्तीच्या मूलांकावरुन म्हणजेच जन्मतारखेनुसार, आपल्याला जीवनातील अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो.

Lord Shiva Favourite Mulank : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, श्रावण (Shravan) महिना सध्या सुरु आहे. हा महिना भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. त्यामुळे या काळात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. शंकराची पूजा करतात. तसेच, सोमवारी उपवास देखील करतात.
भोलेनाथांची सर्व भक्तांवर कृपा असते हे तर आपल्याला माहीत आहेच. पण, काही जन्मतारखेच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असते. याच संदर्भात सविस्तर वाचूयात.
अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, व्यक्तीच्या मूलांकावरुन म्हणजेच जन्मतारखेनुसार, आपल्याला जीवनातील अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. त्यामुळे या ठिकाणी असे कोणत्या जन्मतारखेचे लोक आहेत जे भगवान शंकराचे प्रिय आहेत ते जाणून घेऊयात.
मूलांक 7
कोणत्याही जन्मतारखेच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. हा मूलांक केतू ग्रहाशी संबंधित आहे. या जन्मतारखेचे लोक फार अबोल असतात. यांना सहजासहजी आपल्या गोष्टी इतरांबरोबर शेअर केलेल्या आवडत नाहीत. तसेच, भगवान शंकराची पूजा केल्याने यांना मानसिक शांती मिळते. याच कारणामुळे भगवान शंकर यांच्यावर प्रसन्न होतात आणि यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येते.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या जन्मतारखेचे लोक फार साहसी स्वभावाचे असतात. यांना भोलेनाथांची पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो. तसेच, या मूलांकाचे लोक कोणत्याही कठीण परिस्थितीला न घाबरता धिटाने त्याचा सामना करतात. यामुळेच यांना मेहनत केल्याने आयुष्यात भरपूर यश मिळतं.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या जन्मतारखेच्या लोकांचा संबंध बुध ग्रहाशी आहे. जर या जन्मतारखेचे लोक खऱ्या भक्तीने भोलेनाथांची पूजा करत असतील तर त्यांच्या भावना भोलेनाथांपर्यंत पोहोचतातच. यामुळेच करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळतं. यांच्या मेहनतीवरच प्रसन्न होऊन भगवान शंकर यांना आशीर्वाद देतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Numerology : 'भोला भाला सा, सीधा साधा सा'....'या' जन्मतारखेचे लोक असतात फारच साधेभोळे; कोणीही सहज दुखवू शकतं, प्रेमातही कन्फ्युजन



















