Libra Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: तूळ राशीच्या लोकांना या आठवड्याच्या सुरुवातीला (Weekly Horoscope) काही चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पैसे आणि भेटवस्तू मिळू शकतात. व्यवसायात भावंडांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांना काहीतरी रोजगार मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला कामासाठी घरापासून दूर जावं लागेल. फॅशन आणि डिझायनिंग क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी नोकरीत बढतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवाल.


व्यावसायिक व्यवहार विचारपूर्वक करा


व्यवसाय करणाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर, या संपूर्ण आठवड्यात सर्व प्रकारच्या व्यावसायिक व्यवहारात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणाशीही व्यवहार करताना सतर्कता बाळगावी लागेल. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात कुटुंबातील एखाद्या सदस्याचे विशेष सहकार्य लाभेल.


आठवड्याच्या शेवटी नोकरीत बढतीची शक्यता


नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. आठवड्याच्या शेवटी नोकरीत बढतीची शक्यता आहे. फॅशन आणि डिझायनिंग क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळेल. सहकाऱ्यांसोबत मनोरंजक गोष्टी होतील.


फायद्यासाठी सोन्याचे दागिने आणि जमिनीत गुंतवणूक करा


तूळ राशीच्या सप्तम भावात गुरु ग्रह असल्यामुळे, भविष्यात अशा वस्तूंच्या खरेदीसाठी हा आठवडा चांगला आहे, ज्याची किंमत भविष्यात वाढू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्याचे दागिने, घर-जमिनीत गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.


कुटुंबात राहील आनंदाचं वातावरण


आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आकर्षण आणि प्रेमाची भावना असेल. सप्ताहाच्या मध्यात वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. अनावश्यक संशय टाळा, नाहीतर नाती कमकुवत होतील. या आठवड्यात कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा आखलेला बेत कुटुंबातील सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळासाठी पुढे ढकलला जाण्याची भीती आहे, यामुळे तुम्ही आणि घरातील मुलं काहीसे नाराज दिसतील.


तूळ राशीच्या विद्यार्थ्यांचं साप्ताहिक जीवन


आठवड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी घरापासून दूर जावं लागेल. त्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या आई-वडिलांपासून वेगळं होण्‍याची वेदना जाणवेल. मनात दुःख राहील. या आठवड्यात ध्येय साध्य करण्यासाठी तूळ राशीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने योग्यरित्या नियोजित पद्धतीने पुढे जाणं आवश्यक आहे.


तूळ राशीचं या आठवड्यातील आरोग्य


आठवड्याच्या सुरुवातीला तुमचं आरोग्य सुधारेल. हाडांशी संबंधित आजारांपासून आराम मिळेल. त्वचेचे आजार वाढणे थांबेल. तब्येतीत सुधारणा होईल. कोणत्याही आजाराबद्दल अति काळजी करू नका, तुम्हाला योग्य उपचार मिळाल्यास तुम्ही बरे व्हाल. आठवड्याच्या शेवटी तुमचं आरोग्य चांगलं राहील. पोटदुखी, ताप, डोकेदुखी इत्यादी हंगामी आजार होऊ शकतात. सात्विक अन्न खा. योगासने आणि प्राणायाम नियमित करत राहा. खूप पाणी प्या.


तूळ राशीसाठी उपाय


शुक्रवारी कमळ किंवा गुलाबाच्या फुलांनी लक्ष्मीची पूजा करा. बर्फी अर्पण करा आणि देवी लक्ष्मीची आरती करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Virgo Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात सावध राहण्याची गरज, समस्यांना सामोरे जावे लागू शकते