Libra Horoscope Today 9 May 2023 : तूळ राशीच्या  (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. भांडण करणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. हुशारीने वागा. आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला हळूहळू यश मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नातेवाईकांचेही सहकार्य मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांनी अधिक मेहनत घेतल्यास परीक्षेत त्यांना चांगलं यश मिळेल. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्व काही ठीक आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमचे कायदेशीर काम जे चालू होते ते आज संपेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

तूळ राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरी व्यावसायिकांसाठी मंगळवारचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या वेळी व्यवसायाचा विस्तार करण्याचे नियोजन करू शकता आणि ग्राहकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विक्रीत चांगली वाढ होईल. वाचनाशी निगडीत कामांमध्ये प्रगती होताना दिसेल. विद्यार्थ्यांसाठी काही नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाऊ शकतात. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षकांचे काम वाढताना दिसेल. या राशीचे नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये खूप व्यस्त राहतील.

तूळ राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरून वाद होऊ शकतो, घरातील शांततेसाठी, रागावर नियंत्रण ठेवा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळचा वेळ मित्रांंबरोबर चांगला जाईल.

Continues below advertisement

आज तूळ राशीचे आरोग्य

तुला राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. अनियमित खाण्याच्या सवयी सुधारा.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 पिंपळाची पाने स्वच्छ करून त्यावर चंदनाने श्रीराम लिहा आणि नंतर हनुमानाला अर्पण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य