Libra Horoscope Today 12th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. आज तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटायला येतील त्यांना भेटून तुमच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. मित्राबरोबर कुठेतरी फिरायला जाण्याचा विचारही कराल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत करू शकाल.
बोलण्यात गोडवा ठेवा
आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवाल. त्यामुळे बोलण्यात गोडवा ठेवा. वाद होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला उच्च अधिकार्यांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल
आज कुटुंबातील आणखी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. तसेच जोडीदाराचं सहकार्य मिळेल.
आज तूळ राशीचे आरोग्य
तूळ राशीच्या लोकांना छातीत दुखण्याची तक्रार असू शकते. हृदयरुग्णांनी औषध आणि उपचाराबाबत कोणतीही निष्काळजीपणा करू नये.
तूळ राशीसाठी आजचे उपाय
वादविवादापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. 11 परिक्रमा करून हनुमान चालीसाचं पठण करा आणि हनुमान मंत्रांचा जप करा.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :