Libra Horoscope Today 08 June 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात (Education) यश मिळेल. तुमच्या व्यवसायातील (Business) रखडलेल्या योजना तुम्ही पुन्हा सुरू करू शकाल. नोकरदार (Employees) लोकांना आज नोकरीत (Job) प्रगतीची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप खूश होतील. तुमचे रखडलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जे लोक बँक आणि आयटीशी संबंधित आहेत त्यांना आज खूप फायदा होईल. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतायत, त्यांना खूप फायदा होणार आहे. छोट्या व्यावसायिकांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

बोलण्यात गोडवा ठेवा

तूळ राशीच्या लोकांना आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. त्यामुळे बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल अन्यथा घरात वाद होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेने चांगला आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. 

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

आज घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. 

Continues below advertisement

तूळ राशीसाठी आजचे उपाय

वारंवार होणाऱ्या भांडणांपासून दूर राहण्यासाठी आज नारायण कवच पठण करा. तसेच, गाईला चारा खाऊ घाला.  

आज तूळ राशीचे आरोग्य

आज मधुमेहाचे जे रूग्ण आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. गोड पदार्थांचं सेवन कमी करा.   

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08 June 2023 : मेष, तूळ, मकरसह 'या' राशींवर असेल लक्ष्मीची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य