Leo Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होणार, चुकीच्या गोष्टीत पैसा खर्च करु नका; सिंह राशीसाठी महत्त्वाचा सल्ला
Leo Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Leo Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा सिंह राशीसाठी नेमका कसा असणार आहे? सिंह राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Relationship Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. या आठवड्यात नवरात्र असल्या कारणाने तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. जे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतात त्यांनी आपल्या पार्टनरबरोबर संवाद वाढवण्याची गरज आहे.
सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही कामाच्या बाबतीत फार व्यस्त असाल. त्यामुळे कामाचा वाढता तणाव जाणवेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील त्यामुळे तुम्ही त्या योग्यरित्या पार पाडणं गरजेचं आहे. सिव्हील इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तर, बॅंकिंग आणि अकाऊंटिंग प्रोफेशनल्सना नवीन नोकरीची संधी मिळेल.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
बिझनेसच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवडा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असे. जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी, वाहन, घर खरेदी करायचं असल्यास त्यासाठी हा चांगला दिवस आहे.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
नवीन आठवड्यात ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे अशा लोकांनी फार सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास जड सामान उचलू नका. कामाच्या सतत तणावामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. यासाठी योग, ध्यान, व्यायामाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :