Leo Horoscope Today 26 May 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार (Employees) लोकांना आज नोकरीत (Job) नवीन जबाबदारीचा फायदा होईल. वरिष्ठांकडूनही तुमची प्रशंसा होईल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आईच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. व्यावसायिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह (Family) धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत ते त्यांच्या कुटुंबियांना भेटायला येतील. मित्रांचे (Friends) सहकार्य मिळेल. मित्रांसोबत मिळून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल.
प्रयत्नांना यश मिळणार
सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांना आज शत्रूंवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जास्त मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा, अन्यथा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहेत. नोकरदार वर्गाला कामातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक बाबतीत कोणाकडून उधारी घेणं टाळा. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या मान-सन्मानात आज वाढ होईल. राजकारणात (Politics) ज्यांना करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. नेत्यांना भेटण्याची सधी मिळेल.
आजचे सिंह राशीचे आरोग्य
आज तुम्हाला त्वचेची अॅलर्जी किंवा खाज येण्याची समस्या भासू शकते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
भगवान शिवाची पूजा करा आणि गंगेच्या पाण्यात कच्चे दूध मिसळून अर्पण करा. शिव चालिसाचं पठण करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :