Leo Horoscope Today 24th March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदारांसाठी (Employees) आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. मानसिकदृष्ट्या खूप हलके वाटेल. विवाहित लोक आपल्या कौटुंबिक जीवनात आनंदी दिसतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज एखाद्या मित्रामुळे तुमची संकटापासून सुटका होऊ शकते. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते.
प्रयत्नांना यश मिळणार
सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूंवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जास्त मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा, अन्यथा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहेत.
बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला निर्णय आज मार्गी लागेल. तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल, त्यामुळे कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्व नातेवाईकांची घरी ये-जा सुरु असेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. नाहीतर तुमचे संबंध बिघडू शकतात. नोकरदार वर्गाला कामातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक बाबतीत कोणाकडून उधारी घेणं टाळा. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या मान-सन्मानात आज वाढ होईल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
आजचे सिंह राशीचे आरोग्य
आज सिंह राशीचे आरोग्य चांगले राहील. पण, कामाच्या ताणामुळे काही काळ विश्रांती घ्यावीशी वाटेल.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर दिवा लावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :