Leo Horoscope Today 24 May 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आज व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यावसायिक वर्ग खूप आनंदी होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीतही प्रगतीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. बँकेशी संबंधित व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आजचा दिवस करमणूक करण्यासाठी चांगला आहे, त्यामुळे तुमच्या आवडत्या गोष्टी करा आणि कामाचा आनंद घ्या.
व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. मित्रांची वृत्ती सहकार्याची असेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे असेल तर आतापासूनच पैसे वाचवायला सुरुवात करा. राजकारणात यश मिळवण्यासाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल.
कुटुंबाचं सहकार्य मिळेल
कुटुंबात एकमेकांतील होणाऱ्या वादामुळे घरातील वातावरण तणावाचे राहील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे. कोणतीही तिखट प्रतिक्रिया देणं टाळा. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसू शकतात. जे लोक कामानिमित्त आपल्या कुटुंबापासून लांब राहतायत आज त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. लवकरच त्यांना भेटण्याचा योग देखील येऊ शकतो. आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहिल. राजकीय क्षेत्रातील तुचं व्यक्तिमत्त्व खुलेल. मित्र-मैत्रीणींशी मोकळेपणाने संवाद साधाल. आरोग्य चांगले राहिल.
सिंह राशीचे आजचे आरोग्य
आज पाठदुखीच्या तक्रारी भासू शकतात आणि यासाठी भुजंग आसन केल्याने तुम्हाला फायदा होईल. व्यायामासाठीही वेळ काढा.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
आज भगवान विष्णूची पूजा करा आणि तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. मनापासून पूजा करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :