Leo Horoscope Today 01 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या संपत्तीतही वाढ होईल. भावंडांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. धार्मिक कार्यात खर्च केल्याने आज तुमची कीर्ती वाढेल आणि तुमचा मान-सन्मानही वाढेल. यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला नंतर खूप फायदा होईल. आज अनोळखी व्यक्तीबरोबर पैशांचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. 


शुभवार्ता मिळेल  


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल. काही शुभवार्ताही मिळतील. वैवाहिक जीवनात अनावश्यक वाद टाळा, अन्यथा मानसिक तणाव होऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आज आपल्या कृतींबाबत सावध राहा. 


तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल, त्यामुळे कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्व नातेवाईकांची घरी ये-जा सुरु असेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. नाहीतर तुमचे संबंध बिघडू शकतात. नोकरदार वर्गाचे कामातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक बाबतीत कोणाकडून उधारी घेणं टाळा. आज जर तुम्ही सर्व काम पूर्ण झोकून आणि मेहनतीने केले तर येणाऱ्या काळात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.


जर तुमच्या कुटुंबात काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील. सर्व लोकांना एकत्र पाहून तुमचे मन देखील खूप आनंदी होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या निवृत्तीमुळे घरात पार्टीचे आयोजन केले जाईल या निमित्ताने नातेवाईकांची ये-जा राहील.


आजचे सिंह राशीचे आरोग्य 


आज सिंह राशीचे आरोग्य चांगले राहील. पण, कामाच्या ताणामुळे काही काळ विश्रांती घ्यावीशी वाटेल. 


सिंह राशीसाठी आजचे उपाय 


उद्या उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर दिवा लावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 01 June 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य