Laxmi Narayan Yog : 2026 वर्षातला सर्वात शक्तिशाली योग; लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; पैसा, नोकरी, करिअरला चार चॉंद
Laxmi Narayan Yog 2026 : जेव्हा बुद्धी, व्यवसाय आणि वाणीचा कारक बुध ग्रह आणि सुख-संपत्ती, वैभवाचा दाता शुक्र ग्रह एकत्र येतात. तेव्हा लक्ष्मी नारायण योग जुळून येतो.

Laxmi Narayan Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राजयोगाचा व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. नवीन वर्षातही असाच एक विशेष आणि शुभ योग जुळून येणार आहे. याला लक्ष्मी नारायण योग (Laxmi Narayan Yog) म्हणतात. जेव्हा बुद्धी, व्यवसाय आणि वाणीचा कारक बुध ग्रह आणि सुख-संपत्ती, वैभवाचा दाता शुक्र ग्रह एकत्र येतात. तेव्हा हा योग जुळून येतो. यंदा बुध आणि शुक्र ग्रहाची युती कुंभ राशीत होणार आहे. या ठिकाणी राहू ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे त्रिग्रही योगाबरोबरच लक्ष्मी नारायण योगदेखील निर्माण होणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी शुक्र ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला. या ठिकाणी बुध आणि राहू आधीपासून विराजमान आहे. हा शुभ योग 2 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. चंद्र राशीच्या आधारे मेष, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभ मिळणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग करिअर आणि पैशांच्या बाबतीत शुभकारक ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कामाबरोबरच अनेक जबाबदाऱ्याही वाढतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग फार शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. धनयोगाने तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, या कालावधीत तुमचे प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ शुभकारक असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांच्या पंचम भावात लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे. पंचम भाव बुद्धी, प्रेम, संतान तसेच, रचनात्मक गोष्टींशी संबंधित आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं दिसेल. लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















