Last Week Of December Lucky Zodiac Signs : डिसेंबरच्या (December 2025)शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा काही राशींसाठी फार खास असणार आहे. या काळात ग्रहांच्या संक्रमणामुळे तुमच्या नशिबाचे दार उघडतील. त्यानुसार, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा कोणकोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) लकी ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी डिसेंबरचा ठेवटचा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी देखील तुमचं कौतुक केलं जाईल. जे लोक प्रेमाच्या आणि खऱ्या पार्टनरच्या शोधात आहेत त्यांना आयुष्याचा जोडीदार भेटेल. तसेच, तुम्ही ज्या कामाची आतुरतेने वाट पाहात होतात ते काम समोरुन तुमच्याकडे चालत येईल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा शुभकारक ठरणार आहे. या काळात ज्या लोकांनी तुमच्याबरोबर वाईट केलं आहे त्यांना त्याचं फळ मिळेल. तसेच, तुमच्या मदतीने इतरांचं भलं होईल. नवीन वर्षात तुमचं भाग्य उजळणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही. या काळात तुम्हाला फक्त तुमच्या जुन्या नात्यांमधून बाहेर पडावं लागेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा चांगला जाणार आहे. या काळात शुक्र आणि बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. या कालावधीत तुम्ही काही नवीन वस्तूंची खरेदी देखील करु शकता. करिअरच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा फार योग्य असणार आहे. 

खास उपाय 

रोज 108 वेळा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. तुमच्या मनातील इच्छा हिरव्या पेनाने एका स्वच्छ कागदावर लिहा. तुमच्या ग्रहाशी संबंधित उपाय फॉलो करा. 

हे ही वाचा :                                                          

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Yearly Numerology 2026 : 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2026? वाचा प्रेम, करिअर, नोकरी आणि आरोग्य