Continues below advertisement

Lakshmi Pujan 2025: दिवाळी (Diwali 2025) हा आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असलेला प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत समृद्धीची देवी लक्ष्मीची (Goddess Lakshmi) पूजा केली जाते. समृद्धीशिवाय आनंद अशक्य आहे आणि ज्ञानाशिवाय समृद्धी अशक्य आहे. दिवाळीत गणेश आणि लक्ष्मी दोघांचीही पूजा केली जाते. यंदा लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2025) आज 21 ऑक्टोबर 2025 रोजी साजरे केले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या काळात धनाची देवता देवी लक्ष्मी प्रत्येक घरात येते, आणि आशीर्वाद देते. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी हा शुभ मुहूर्त अजिबात चुकवू नका.. जाणून घ्या पूजा पद्धत, नियम, आणि बरंच काही...

यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार?

  • ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त मंगळवार, 21 ऑक्टोबरलाच आहे, असे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी स्पष्ट केले.
  • 20 ऑक्टोबरला चतुर्दशी तिथी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी संपून अमावस्या सुरू होते.
  • त्या दिवशी प्रदोषकाळात अमावास्येची अधिक व्याप्ती असल्याने तो दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य मानला जात नाही.
  • 21 ऑक्टोबरला अमावास्या प्रदोषकाळात अल्पकाळ असली तरी शास्त्रानुसार त्या काळात पूजन करणे अधिक फलदायी ठरते.
  • धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय आणि व्रतपर्वविवेक या ग्रंथांतील वचनांचा संदर्भ देत डॉ. वैद्य यांनी सांगितले की,
  • अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असलेल्या दिवशी पूजन केल्यास लक्ष्मी स्थिर राहते.

लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे?

पंचांगानुसार, यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे 21 ऑक्टोबर, संध्याकाळी 6:10 ते 8:40 दरम्यान आहे. या काळात, तुम्ही निर्धारित विधीनुसार लक्ष्मी पूजा करू शकता.

Continues below advertisement

  • लक्ष्मीपूजन (शुभ मुहूर्त) सायंकाळी 6:10 ते 8:40
  • प्रदोष काळ सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांचा काळ
  • अमावास्या तिथीची सुरुवात 20 ऑक्टोबर 2025, दुपारी 3:44
  • अमावास्या तिथीची समाप्ती 21 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 5:54
  • लक्ष्मीपूजनाची तारीख 21 ऑक्टोबर 2025

लक्ष्मीपूजन 2025 पूजा विधी

  • घर, पूजा कक्ष, देवस्थान स्वच्छ करा.
  • पाट किंवा चौरंग ठेवा, त्यावर लाल किंवा पिवळे कापड टाका.
  • लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून स्थानावर ठेवा.
  • देवीच्या मूर्तीला जलाने (शुद्ध पाणी) स्नान घाला.
  • अशोक, पान, पुष्प अर्पण करा, कमळ, गुलाब इत्यादी पवित्र पुष्प अर्पण करा.
  • दीप, धूप, कुंकू, चंदन, अक्षता, दिवा लावा,
  • धूप द्या, चंदन आणि कुंकू अर्पण करा.
  • नैवेद्य म्हणून फळ, मिठाई, तांदूळ इत्यादी देवता अर्पण करा.
  • लक्ष्मीमंत्र जपा, आरती करा.
  • उपस्थित लोकांना प्रसाद द्या.
  • घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा (दीपोत्सव) हे देवीचे स्वागत समजले जाते.

दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे नियम

  • लक्ष्मीपूजन पूजेदरम्यान काळे कपडे घालू नका.
  • दिवाळीत कोणाशीही वाद घालू नका.
  • दिवाळीत तुमचे घर आणि मंदिर स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या.
  • दिवाळी पूजेदरम्यान तुटलेली भांडी वापरू नका.
  • दिवाळीत देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या तुटलेल्या मूर्तींची पूजा करू नका.

संपत्ती मिळविण्यासाठी लक्ष्मी मंत्र कोणता आहे?

संपत्ती मिळविण्यासाठी अनेक लक्ष्मी मंत्र आहेत, त्यापैकी सर्वात लोकप्रिय बीजमंत्र "ओम श्रीं ह्रीं क्लीम" आहे. हा लक्ष्मी मंत्र कमळाच्या माळेने 108 वेळा जप करावा.

हेही वाचा>>

Lakshmi Pujan 2025: आज लक्ष्मीपूजनाचा दिवस 'या' 6 राशींचं भाग्य घेऊन आला! वैभवलक्ष्मी योग करणार मालामाल, नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा, यश...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)