Kuber Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या जीवनात अनेकदा अशा घटना घडताता ज्यांचा कधी आपल्याला अंदाजही नसतो. अशातच हिंदू धर्मात महत्त्वाचे मानले जाणारे कुबेर देव (Kuber Dev) जर नाराज झाले तर अशा घटना कोणाबरोबरही घडू शकतात.
प्रत्येक व्यक्तीला धन-संपत्तीचं जतन करावंसं वाटतं. ज्यासाठी तो अमाप प्रयत्न करतोच पण त्याचबरोबर काही उपायही करतो. तर, काही व्यक्तींच्या जीवनात इच्छा नसतानाही काही घटना वारंवार निर्माण होतात ज्यांचा कधी त्यांना अंदाजही नसतो. त्यामुळे परिणामत: अशा लोकांना आयुष्यात अनेकदा पैशांची अडचण आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.
हिंदू धर्मात धन संपत्तीची देवता देवी लक्ष्मीसह त्यांचा भाऊ म्हणजेच कुबेराची देखील पूजा केली जाते. जर कुबेर नाराज झाले तर व्यक्तीच्या जीवनात अशा काही घडतात ज्याचा आपण कधीच अंदाजच लावलेला नसतो. त्यामुळे कुबेर देव नाराज होण्याचे कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊयात.
कुबेर देव नाराज होण्याचे संकेत
- ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीला धनहानीचा सामना करावा लागतो. मात्र, जर एखाद्या व्यक्तीला वारंवार धनहानीचा, नुकसानीचा सामना करावा लागत असेल तर त्याला कुबेर देव नाराज आहेत असा संकेत मिळतो.मग तुम्ही कितीही सावधानता बाळगली तरीही तुमचे पैसे एकतर हरवतील किंवा मग चोरी होतील.
- ज्योतिष शास्त्रानुसार, जर व्यक्तीच्या जीवनात वारंवारआवडती वस्तू हरवत असेल किंवा तुटत असेल तर कुबेर देवता नाराज असण्याचे संकेत मिळतात. यामुळे व्यक्तीला आपल्या जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
- ज्योतिष शास्त्रानुसार, कितीही काळजी घेऊनसुद्धा मनी प्लांटचं झाड वारंवार सुखत असेल तर कुबेर देवता नाराज असण्याचा हा संकेत आहे.
जर कुबेर देवता नाराज होऊ नये असं तुम्हालाही वाटत असेल तर यासाठी तुम्ही नियमित 'ॐ लक्ष्मी कुबेराय नमः' या 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः' या मंत्राचा जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :