Ketu Transit 2026: ते म्हणतात ना, माणसाचे एकदा का नशीब उजळले, की तो यशाची पायरी चढत जातो आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहायला गेलं तर यामागे ग्रह-तारे-नक्षत्रांची स्थिती अवलंबून असते. ज्योतिषशास्त्रात केतू हा एक अतिशय खास आणि रहस्यमय ग्रह मानला जातो. त्याला छाया ग्रह असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रात केतूचे संक्रमण अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण त्याचा प्रभाव वैयक्तिक जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर अचानक आणि खोलवर परिणाम करतो. जानेवारी2026 मध्ये केतू आपले स्थान बदलेल.ज्यामुळे 3 राशींना अचानक लक्षणीय यश आणि प्रचंड संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया की या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?

जानेवारी2026 मध्ये केतू स्थान बदलेल, मार्च 2026 पर्यंत 3 राशींना नो टेन्शन..

पंचांगानुसार, जानेवारी2026 मध्ये केतू आपले स्थान बदलेल. 25जानेवारी रोजी केतूपूर्वाफाल्गुनीनक्षत्राच्यादुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर जाईल, जिथे तो 29 मार्च 2026 पर्यंत राहील. ज्योतिषी सांगतात की पूर्वाफाल्गुनीनक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात केतूचा प्रभाव कमी अशुभ आणि अधिक फायदेशीर मानला जातो, जो सर्व राशींवर परिणाम करतो. ज्यामुळे, तीन राशींना अचानक लक्षणीय यश आणि प्रचंड संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया की या भाग्यवान राशी कोणत्या आहेत? तुमच्या राशीचा या यादीत समावेश आहे का

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी हा खूप शुभ काळ आहे. केतूचा पहिल्या पदात प्रवेश अचानक करिअरमध्ये प्रगती आणि पदोन्नती दर्शवितो. गुंतवणूक किंवा नवीन व्यवसायात नफा होईल. कौटुंबिक आनंद आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद वाढेल. मानसिक शांती आणि आध्यात्मिक संतुलन देखील वाढेल, ज्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल. शिक्षण आणि अभ्यासात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात जुन्या वादांचे निराकरण देखील शक्य होईल.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर आहे. अचानक पैसे, नोकरी किंवा व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीमुळे फायदा होईल आणि नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील आणि मानसिक ताण कमी होईल. हा काळ आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासासाठी देखील अनुकूल आहे. सर्जनशीलक्रियाकलाप आणि कलात्मक प्रयत्नांमध्येही यश मिळेल. प्रवास किंवा नवीन संपर्क नवीन शक्यता उघडतील.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी2026 मध्ये केतूचे शुभ संक्रमण धनु राशीचा आत्मविश्वास वाढवेल. जुन्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि प्रचंड संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कामाला गती येईल आणि रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. या काळात नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य फायदेशीर ठरेल. प्रवास किंवा नवीन संपर्क फायदेशीर संधी देऊ शकतात. मानसिक स्थिरताराखणे आणि नियोजित पावले उचलणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा

Shani Transit 2026: टेन्शन संपलं, 30 वर्षांनी 3 राशींचं भाग्य फळफळलं! शनिचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश, 2026 जाणार श्रीमंतीत, कोण होणार मालामाल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)