Ketu Transit 2025: अनेक लोक खूप मेहनत करूनही त्यांच्या पदरात यश मिळत नाही, ज्योतिषशास्त्रानुसार, यामागे ग्रहांच्या हालचाली आणि नशीबाची देखील तितकीच आवश्यकता असते. ज्योतिषशास्त्रात जो क्रूर ग्रह समजला जातो, असा केतू ऑक्टोबर महिन्यात संक्रमण करतोय. ज्याचा 3 राशींच्या लोकांवर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया त्या 3 राशी कोणत्या आहेत.
केतूचे नक्षत्र भ्रमण लाभकारक
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या तिसऱ्या पदात भ्रमण करणार आहे, हे भ्रमण गुरुवार, 23 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 06:03 वाजता होईल. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. त्यापैकी तीन राशींच्या लोकांवर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे.
कोणत्या त्या 3 भाग्यशाली राशी आहेत?
ज्योतिषशास्त्रानुसार, केतूचे नक्षत्र संक्रमण 3 राशींच्या लोकांवर खूप शुभ परिणाम देऊ शकते. करिअरपासून ते व्यवसाय आणि पैशापर्यंतच्या बाबतीत लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. चला जाणून घेऊया या ३ राशी कोणत्या आहेत.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, केतूच्या भ्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक लाभ मिळू शकतात. नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. जीवनात भौतिक गोष्टी वाढतील. राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळू शकतील. राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती करता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, केतूचे हे भ्रमण सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम देऊ शकते. राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळू शकते. आत्मविश्वास वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, केतूचे भ्रमण तूळ राशीच्या लोकांना विशेष लाभ देणार आहे. राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती करता येईल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता असेल. मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात भाग घेता येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता.
हेही वाचा :
Chandra Grahan 2025: 7 सप्टेंबरच्या चंद्रग्रहणापासून 'या' 3 राशी ताकही फुंकून पितील! वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणणार संकट? काय काळजी घ्याल?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)