Ketu Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाला फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण जेव्हा ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्ती दैनंदिन जीवनावर होतो. त्यानुसार, आज म्हणजेच 29 मार्च 2026 रोजी पापी ग्रह केतूचं नक्षत्र परिवर्तन झालं आहे. आज केतूने मघा नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्रात केतूचं संक्रमण हे काही राशींसाठी फार शुभकारक ठरेल. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
या राशीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, भविष्यात पैशांची गुंतवणूक कराल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या कालावधीत तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तसेच, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. समाजातील काही प्रतिष्ठीत लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तुमच्या महत्त्वाच्या कामात कोणताच अडथळा येणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचं हे नक्षत्र परिवर्तन धनसंपत्तीत भरभराट करुन देणारं आहे. या कालावधीत पैशांच्या बाबतीत देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे तुमचा बॅंक बॅलेन्स वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत वाढ झालेली दिसेल. तुमच्या घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, जर तुम्हाला परदेशात काम करायचं असेल तर तशी संधी तुम्हाला मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन उपलब्धतेचं असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तसेच, व्यवसायात तुमच्या हातात चांगली डील मिळू शकते. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुमचा सतत प्रवास होत राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
