Karwa Chauth 2023: विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करवा चौथचं (Karwa Chauth) व्रत करतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला करवा चौथचे व्रत केलं जातं. विवाहित महिला करवा चौथच्या व्रताची आतुरतेने वाट पाहत असतात. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जल व्रत करतात.


यावेळी करवा चौथचा उपवास बुधवारी, म्हणजेच 1 नोव्हेंबरला केला जाणार आहे. आश्विन संकष्टी चतुर्थी या दिवशी येते. या व्रतामध्ये भगवान शिव, देवी पार्वती आणि चंद्राची पूजा केली जाते. यावेळी करवा चौथच्या दिवशी अनेक शुभ योगही आहेत. करवा चौथच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची नेमकी वेळ जाणून घेऊया.


करवा चौथ 31 ऑक्टोबरला की 1 नोव्हेंबरला? (Karwa Chauth 31 october or 1 November 2023)


कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 31 ऑक्टोबर 2023 ला रात्री 9:30 वाजता सुरू होईल. चतुर्थी तिथीची समाप्ती 1 नोव्हेंबर 2023 ला रात्री 9:19 वाजता होईल.


करवा चौथ व्रत उदयतिथीपासून वैध आहे, म्हणून यावर्षी करवा चौथ 1 नोव्हेंबर 2023, म्हणजेच बुधवारी पाळण्यात येईल.


करवा चौथ 2023 मुहूर्त (Karwa Chauth 2023 Muhurta)


करवा चौथच्या दिवशी महिला संध्याकाळी चौथ माता, करवा माता आणि गणपतीची पूजा करतात आणि चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य देतात.


करवा चौथ उपवासाची वेळ - सकाळी 06:36 ते रात्री 08:26 (1 नोव्हेंबर 2023)
करवा चौथ पूजा मुहूर्त - संध्याकाळी 05:44 ते संध्याकाळी 07:02 (1 नोव्हेंबर 2023)
चंद्रोदयाची वेळ - रात्री 08:26 (1 नोव्हेंबर 2023)


करवा चौथ महत्त्व आणि पूजाविधी (Karwa Chauth Significance)


करवा म्हणजे मातीचा घट आणि चौथ म्हणजे चतुर्थी. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया सूर्योदयापूर्वी उठून सरगी खाऊन उपवास सुरू करतात. त्यानंतर महिला दिवसभर निर्जली व्रत ठेवतात. संध्याकाळी स्त्रिया वधूप्रमाणे तयार होतात आणि 16 श्रृंगार करतात आणि पूजा करतात. त्यानंतर संध्याकाळी चाळणीतून चंद्र पाहून, चंद्राला अर्घ्य देवून नवऱ्याची आरती करतात आणि नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहण करुन स्त्रिया उपवास सोडतात.


असं मानलं जातं की, देवी पार्वतीने शिव आणि द्रौपदीने पांडवांसाठी करवा चौथ व्रत पाळला होता. करवा चौथ व्रतामुळे महिलांना शाश्वत सौभाग्याचं वरदान मिळतं. देवी करवा त्यांच्या वैवाहिक जीवनाचं रक्षण करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणते.


(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ