Kartik Purnima 2025 : कार्तिक पौर्णिमेच्या शुभदिनी जुळून आला 'समसप्तक योग'; 'या' 4 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ
Kartik Purnima 2025 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शनी मीन राशीत वक्री करणार आहे. चंद्र मेष राशीत विराजमान असेल तर शुक्र आपली स्वराशी म्हणजेच तूळ राशीत विराजमान होणार आहे.

Kartik Purnima 2025 : हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे , आज देशभरात कार्तिक पौर्णिमेचा (Kartik Purnima) उत्सव साजरा केला जातोय. ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने यंदाची कार्तिक पौर्णिमा फार खास मानली जातेय. याच कारण म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर काही खास दुर्लभ संयोग निर्माण होणार आहेत. यंदा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शनी मीन राशीत वक्री करणार आहे. चंद्र मेष राशीत विराजमान असेल तर शुक्र आपली स्वराशी म्हणजेच तूळ राशीत विराजमान होणार आहे. अशातच चंद्र-शुक्राच्या विशेष स्थितीने समसप्तक योग निर्माण होणार आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या चरणात असतील.
त्याचबरोबर आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, सिद्धी योग आणि रवि योगासह अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग फार शुभकारक मानला जातो. या काळात या शुभ योगामुळे तुमच्या जीवनात स्थिरता आणि प्रगती घेऊन येईल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे शुभ संकेत तुम्हाला मिळतील. तसेच, तुमच्या व्यवसायात धनलाभ मिळेल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. कुटुंबात सुख-शांती आणि सन्मान वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
आज निर्माण झालेला समसप्तक योग मिथुन राशीच्या जीवनात स्थिरता घेऊन येईल. करिअरच्या अनेक संधी तुमच्यासमोर निर्माण झालेल्या दिसतील. तसेच, धनसंपत्तीत भरभराट होईल. नवीन योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सहभाग पाहायला मिळेल. अनेक दिवसांपासून तुमच्या रखडलेल्या कामांना चांगली गती मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या बाबतीत तुम्हाला नवी दिशा सापडेल. ज्या कामातून तुमची ओळख निर्माण होईल तसेच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल अशा कामात तुमचा रस वाढेल. या काळात प्रवासाचे अनेक योग जुळून येतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग हा तुमचा आत्मविश्वास वाढवणारा असेल. तुमच्यातील नेतृत्व गुण समोर येतील. करिअर किंवा समाजात तुमची नवी ओळख निर्माण होईल. एखाद्या जुन्या प्रोजेक्टमधून तुम्हाला लाभ मिळेल. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण निर्माण होईल. मानसिक शांती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















