एक्स्प्लोर

Kaal Sarp Yog 2026: ज्याची होती भीती, तो 'कालसर्प योग' जुळला, 3 राशींना फुटणार घाम! पुढचे 14 दिवस राहू-केतूमुळे तणाव, अडथळे? सतर्कतेचा ग्रहयोग..

Kaal Sarp Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक दशकांनंतर कालसर्प योगचा ग्रहयोग जुळून आला आहे. पुढील 14 दिवस 3 राशींसाठी सतर्कतेचे ठरतील. पैसा, नोकरी, प्रेम...

Kaal Sarp Yog 2026: कालसर्प योग.. एक असा ग्रहयोग, ज्यामुळे अनेकांना भीतीने घाम फुटतो. ज्याचा उल्लेख अनेकदा केला जातो. तुम्ही तुमच्या कुंडलीत काल सर्प योग तयार होत असल्याचे अनेकदा ऐकले असेल, त्यासाठी विविध ज्योतिषीय उपाय किंवा पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रहांच्या काही स्थितीमुळे, 21 जूनपर्यंत, कालसर्प योगाच्या प्रभावामुळे काही राशींसाठी तणाव आणि अडथळे वाढू शकतात. करिअर, नातेसंबंध आणि मानसिक शांतीवर परिणाम होऊ शकतो. ग्रहांच्या हालचालींमुळे परिस्थितीत बदल होऊ शकतो. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत. ज्यांना पुढील 14 दिवस सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊया ग्रहांच्या कालसर्प योगाबद्दल आणि भाग्यशाली राशींबद्दल...

कालसर्प योग.. पुढचे 14 दिवस 3 राशी ताकही फुंकून पितील...

वैदिक पंचांगानुसार, शनिवार, 6 जून रोजी सायंकाळी 7:03 वाजल्यापासून चंद्राने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे धोकादायक असा कालसर्प योग निर्माण होत आहे, जो 21 जूनपर्यंत राहील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सर्व नऊ ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये येतात तेव्हा कालसर्प योग तयार होतो. 7 जून रोजी चंद्राने कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर, सर्व 9 ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये आले आहेत. ज्योतिषींच्या मते, या योगाच्या प्रभावामुळे तीव्र संघर्ष, मानसिक ताण, करिअरमधील अडथळे, विवाह तसेच संततीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे 3 राशींच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, 21 जूनपर्यंत, वृश्चिक राशीच्या लोकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे, कारण असे काही प्रसंग येतील, जेव्हा छोट्या-छोट्या गोष्टींवर अतिप्रतिक्रिया देणे टाळावे. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. एक महत्त्वाचा व्यावसायिक ग्राहक शेवटच्या क्षणी माघार घेऊ शकतो. बँक खाती किंवा पेमेंटशी संबंधित गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पैशांवरून नातेवाईकाशी वाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे मोठा ताण येऊ शकतो. प्रेमसंबंधात शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीत घाई केल्यास नुकसान होऊ शकते. शिवमंत्रांचा जप करा. गरजूंना औषध दान करणे देखील फायदेशीर ठरेल.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, 21 जूनपर्यंत, कालसर्प योगाच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांना मानसिक तणाव जाणवू शकतो. नोकरीच्या नियमांमधील अचानक बदलांमुळे तुम्हाला त्रास होईल. अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे तुमच्यावर दबाव येईल. ऑनलाइन व्यवसायात परतावा किंवा तक्रारी वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित एखादे प्रकरण त्रासदायक ठरू शकते. एका जुन्या मित्राच्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. नात्यांमधील संवादाच्या अभावामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. राजकारणात तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याचा दबाव येईल. कौटुंबिक चिंतेमुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. शनिदेवाला तिळाचे दान करा. मजुरांना मदत करा.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, 21 जूनपर्यंत, सिंह राशीच्या लोकांनी राग आणि संताप टाळावा. महत्त्वाच्या सरकारी कामात वारंवार होणाऱ्या विलंबामुळे तणाव निर्माण होईल. व्यावसायिक भागीदाराकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. कामातील एक छोटीशी चूक चर्चेचा मोठा विषय बनेल. तुमच्या बोलण्यामुळे कुटुंबातील मतभेद वाढू शकतात. लग्नाला विनाकारण विलंब होऊ शकतो. तुमच्या पत्नी आणि मुलांबद्दलची चिंता वाढू शकते. शिक्षकांचा सल्ला न ऐकल्यामुळे विद्यार्थ्यांना नुकसान होऊ शकते. पोलीस किंवा कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित बाबींमधील निष्काळजीपणा महागात पडू शकतो. थकवा आणि चिडचिड वाढू शकते. आराम मिळवण्यासाठी सूर्याची प्रार्थना करा आणि वृद्धांची सेवा करा.

हेही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस...5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल...मोठी भरभराट..! पॉवरफुल 3 राजयोगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेम जीवन एक नंबर..! कोण मालामाल?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
Garud Puran: तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget