Kaal Sarp Yog: ते म्हणतात ना, माणसाचे ग्रहमान बदलले की त्याच्या नशीबी संकट यायला सुरूवात होते. ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या ग्रहांची अशी काहीशी स्थिती सुरू आहे, ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल अनुभवायला मिळत आहेत, अशात 'कालसर्प योग' जो ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत धोकादायक योग मानला जातो. ज्योतिषींच्या मते, हा योग 9 ते 23 जून दरम्यान तयार होतोय या अशुभ योगामुळे चार राशींना धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. त्यामुळे, या राशींच्या लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी, ज्यांना 23 जूनपर्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे...

ग्रहांचा कालसर्प योग कसा आणि कधी तयार होणार? (Kaal Sarp Yog)

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र राहू आणि केतूच्या वर्तुळात प्रवेश करतो. 9 जून रोजी, चंद्र शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे केतू आधीपासूनच आहे. तेव्हा हा नकारात्मक योग तयार होईल. यामुळे चार राशींच्या जीवनात उलथापालथ होऊ शकते. या राशींना मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, कालसर्प योग या राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकतो. तुमचा मानसिक ताण वाढू शकतो आणि तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा कमकुवत होऊ शकते. कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो. एखाद्या मुद्द्यावरून कुटुंबात मतभेदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा, अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात, एखाद्या मुद्द्यावरून तुमचे तुमच्या जोडीदारासोबत भांडण होऊ शकते. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या, अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. कोणतीही कृती घाईने करणे टाळा. जी कामे आधीच सुरू झाली आहेत ती बिघडू शकतात. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यासही विलंब होऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, कालसर्प योग या राशीच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. तुमची मानसिक शांती भंग होऊ शकते. या काळात तुम्ही खूप तणावाखाली असू शकता. तुम्ही कोणाशीही भांडणे टाळावीत. प्रवास अयशस्वी होऊ शकतो. तुमचे आरोग्य बिघडू शकते. कामातील थोडासा निष्काळजीपणा देखील मोठे नुकसान करू शकतो.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती कमजोर होऊ शकते. आरोग्य बिघडू शकते. खर्चाचा भार अचानक वाढू शकतो. वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबतचे तुमचे संबंध ताणले जाऊ शकतात.

कालसर्प योगाचे नकारात्मक परिणाम टाळण्याचे उपाय

  • भगवान शिवाची पूजा करा. त्यांचे मंत्र आणि चालिसा म्हणा.
  • संध्याकाळी राहू-केतू मंत्रांचा जप करा. 

हेही वाचा

Vastu Shashtra: जावयांनो...सासरवाडीहून 'या' वस्तू कधीच घेऊन येऊ नका! शनि-राहूच्या कोपाला सामोरे जाल, मुलींनीही 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)