January 2026 Monthly Horoscope :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, लवकरच नवीन वर्ष 2026 (New Year 2026) ला सुरुवात होणार आहे. या वर्षाचा पहिला महिना म्हणजेच जानेवारीचा (January) महिना कसा असेल याबाबत अनेकांना उत्सुकता असते. मात्र, या काळात ग्रहमानांच्या संक्रमणाचा देखील राशींवर परिणाम होताना दिसतो. त्यानुसार, जानेवारी महिना कोणकोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) कठीण जाणार आहे ते जाणून घेऊयात.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना आव्हानात्मक असणार आहे. या काळात सुरुवातीला तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कामाच्या बाबतीत तुम्हाला सामंजस्याने व्यवहार करणं गरजेचं आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक स्थितीचा सामना करावा लागेल. मात्र, अशा वेळी कुटुंबियांची साथ तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना थोडाफार सुस्तीचा असणार आहे. या काळात तुम्हाला सतत आळस येत राहील. काही नवीन गोष्टी कराव्याशा वाटणार नाहीत. तसेच, पैशांच्या बाबतीत तुमच्यावर सतत दबाव जाणवत राहील. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत सुख मिळणार नाही. अशा वेळी योग, ध्यान करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी जानेवारीचा महिना मानसिक दबावाचा तसेच, जबाबदारीचा असणार आहे. मात्र, जसजसे दिवस पुढे जातील तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू लागतील. या महिन्यात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, नात्यात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य तुमचं एकदम सामान्य असणार आहे. फक्त तणावाला जास्त वर्चस्व गाजवू देऊ नका.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अनावश्यकपणे वाढ होईल. तसेच, तुमच्या कामातून तुम्हाला थकवा जाणवू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. अशा वेळी तुमची चिडचिड होऊ शकते. मात्र, संयम ठेवणं गरजेचं आहे. या महिन्यात कोणतीच जोखीम हातात घेऊ नका. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा चांगला की वाईट? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य