January 2026 Monthly Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना संपून लवकरच नवीन वर्ष 2026 सुरू होणार आहे. या वर्षातील पहिला महिना जानेवारी देखील लवकरच सुरु होणार आहे. 2026 वर्षाचा पहिला महिना असल्या कारणाने हा महिना कसा जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तसेच, या महिन्यात ग्रहांची स्थिती तशी शुभ मानली जातेय. या महिन्यात मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे जानेवारी 2026 चा (January 2026) महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope)जाणून घेऊयात.

मेष रास (Aries January 2026 Monthly Horoscope)

मेष राशीसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार अनुकूल असणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे तुम्हाला साहस ठेवावा लागेल. सूर्य ग्रहामुळे तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हा अत्यंत पॉवरफुल महिना आहे. ऑफिसमध्ये तुमच्या लीडरशिप क्वालिटीचं कौतुक केलं जाईल. तसेच, बॉसकडून काही नवीन जबाबदाऱ्याही सोपवण्यात येतील. या कालावधीत तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास (Taurus January 2026 Monthly Horoscope

वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमचं नशीब बदलण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तुम्ही जे जे दु:ख सहन केलंय त्यातून तुमची सुटका होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. व्यावसायिक दृष्टीकोनातून अनेक छोट्या मोठ्या यात्रा तुम्हाला जास्त नफा मिळवून देतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लवकरच लग्नाचे योग जुळून येतील. 

मिथुन रास (Gemini January 2026 Monthly Horoscope)

बुध ग्रहाच्या स्थितीने नवीन महिन्यात तुम्हाला मानसिकदृष्ट्या शांती मिळेल. शनिच्या ढैय्याचा थोडाफार परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्ही नवीन वस्तू घरासाठी घेणं लाभदायी ठरेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पार्टनरबरोबर जुने वाद मिटतील. गैरसमज दूर होतील. फक्त वाणीवर नियंत्रण ठेवण्याची तुम्हाला जास्त गरज आहे. 

कर्क रास (Cancer Monthly Horoscope January 2026)

जानेवारी महिन्यात चंद्राच्या संक्रमणाचा परिणाम कर्क राशीवर होणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात अनेक चढ-उतार निर्माण होतील. तुम्हाला अनेकदा एकटं वाटेल. तसेच, आर्थिकदृष्ट्या तुम्ही जरी सक्षम असलात तरी तुम्हाला सतत माणसांची कमतरता जाणवेल. या कालावधीत जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला जास्त नफा मिळेल. तुमच्या आरोग्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी नियमित योग आणि ध्यान करायला विसरु नका. तसेच, पुरेशी झोप घ्या. 

सिंह रास (Leo Monthly Horoscope January 2026)

सूर्य ग्रहाच्या संक्रमणाने तुमच्यातील पराक्रम भाव सक्रिय असेल. तुमच्या वर्षाची सुरुवात फार चांगली होईल. तसेच, तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील. जर तुम्ही एखाद्या पार्टनरच्या शोधात असाल तर या महिन्याच्या शेवटी तुम्हाला तो भेटण्याची शकयता आहे. विनाकारण पैसे खर्च करु नका. अन्यथा महिन्याच्या शेवटी आर्थिक तंगी जाणवेल. 

कन्या रास (Virgo Monthly Horoscope January 2026)

कन्या राशीसाठी जानेवारी महिना चांगला असणार आहे. या काळात बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात एकाग्रता जाणवेल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत काही शुभ कार्य तुमच्या हातून घडतील. तुमच्या एकंदर व्यवहारात स्थिरता आलेली दिसेल. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. 

हे ही वाचा :                     

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Baba Vanga Prediction : 2026 मध्ये 'या' 5 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस; पैसा, नोकरी, करिअरमध्ये जबरदस्त यश; बाबा वेंगाची भविष्यवाणी