एक्स्प्लोर

Janmashtami 2026: जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला सजवताय? 'या' रंगाचे वस्त्र चुकूनही घालू नये! 'हे' रंग सुख-समृद्धीसाठी सर्वात फलदायी, ज्योतिष - वास्तुशास्त्रात म्हटलंय...

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला कोणत्या रंगाचे वस्त्र घालावेत याबद्दल लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

Janmashtami 2026: आज 4 सप्टेंबरचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे. पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी अवघ्या देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. या दिवशी लोक आपल्या घरी भगवान कृष्णाचे बालरूप असलेल्या बाळगोपाळाची विशेष पूजा करतात. या दिवशी, भगवान कृष्णाच्या जन्मानंतर, त्यांच्या मूर्तीला सजवून उत्तम वस्त्रे परिधान केली जातात. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार बाळगोपाळसाठी कोणत्या रंगाचे कपडे सर्वात फलदायी आहेत. हे सांगणार आहोत, वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, योग्य रंगाची निवड केल्याने घरात केवळ समृद्धीच येत नाही, तर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वादही मिळतो.

हा रंग भगवान श्रीकृष्णाचा सर्वात प्रिय आणि फलदायी रंग...(Janmashtami 2026)

वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार, जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे घालणे हे सर्वोत्तम आणि सर्वात शुभ मानले जाते. याचे कारण असे की, पीतांबराधारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान कृष्णाला पिवळा रंग प्रिय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पिवळा रंग गुरु ग्रहाशी आणि घरातील सुख-समृद्धीशी देखील संबंधित आहे. जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपाळाला पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि आनंद वाढतो.

'हे' 2 रंग देखील अत्यंत शुभ...

ज्योतिषशास्त्रानुसार, काही वेळेस लोकांकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतात, तर तुमच्याकडे इतरही पर्याय आहेत. तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाचे कपडे निवडू शकता. यामागे एक कारण आहे. हिरवा रंग निसर्ग, ताजेपणा आणि कौटुंबिक वाढीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे, जन्माष्टमीच्या दिवशी बाळ गोपाळाला हिरव्या रंगाचे कपडे घातल्याने घरात शांत आणि आनंदी वातावरण निर्माण होते. लाल रंग उत्साह आणि सुदैवाचे प्रतीक मानला जातो. बाळ गोपाळाला लाल रंगाचे कपडे घातल्याने कुटुंबातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा येतो.

'हे' रंग मन:शांती देणारे...

वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार, जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालणे देखील आदर्श मानले जाते. कारण पांढरा रंग पवित्रता आणि मनाच्या शांतीचे प्रतीक आहे. जर तुमच्या घरात अशांती किंवा तणाव असेल, तर भगवान कृष्णाला पांढऱ्या रेशमी वस्त्रांमध्ये सजवण्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, गुलाबी रंग प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक आहे. बाळ गोपाळाला गुलाबी रंगाचे कपडे घातल्याने मनाला आनंद मिळतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि बंधुत्व दृढ होते.

श्रीकृष्णाला 'या' रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळा...

  • भगवान श्रीकृष्णाला वस्त्र घालताना, त्याच्या कपड्यांचा रंग काळजीपूर्वक निवडणे देखील तितकेच आवश्यक आहे. 
  • जन्माष्टमीच्या प्रसंगी, श्रीकृष्णाला काळ्या, गडद निळ्या किंवा राखाडी रंगाचे कपडे घालणे टाळा.
  • हिंदू परंपरेत आणि धार्मिक विधींमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो. असे गडद रंग पूजेच्या वातावरणात नकारात्मकता आणू शकतात. 
  • म्हणून, अलंकरणासाठी नेहमी तेजस्वी आणि हलक्या रंगाचे कपडे निवडावेत.

'या' शिवाय भगवान श्रीकृष्णाचे रूप अपूर्ण

भगवान श्रीकृष्णाला वस्त्रासोबतच, त्याच्या मुकुटात मोराचे पीस लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण त्याशिवाय कृष्णाचे रूप अपूर्ण आहे. तसेच, त्याच्या हातात एक छोटी बासरी, गळ्यात वैजयंतीची माळ आणि कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची खात्री करा. जन्मानंतर रात्री 12 वाजता बाळगोपाळाला पंचामृताने स्नान घालावे आणि त्याला नवीन कपडे घालावेत. पूर्ण भक्तीने केलेले हे अलंकरण भगवान कृष्णाला प्रसन्न करते.

हेही वाचा :

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सप्टेंबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर
शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Horoscope Today 10 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 10 October 2026: आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Embed widget