Jain Sadhu Ritual : धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्मात पंथाचे लोक असतात. तसेच, जैन धर्मात दोन प्रकारचे पंथ असतात. यांना श्र्वेतांबर आणि दिगंबर म्हणतात. हे साधू दीक्षा घेतल्यानंतर फार कठोर जीवन जगतात. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक संसाधनांचा ते वापर करत नाहीत. आपण अनेकदा जर या साधूंना किंवा साध्वीला पाहिलं असेल तर त्यांच्या शरीरावर फक्त पांढऱ्या रंगाचं सुती कापड गुंडाळलं असतं. 

जैन धर्मशास्त्रानुसार, दिगंबर साधू कधीच कपडे घालत नाहीत. तर, जैन पंथाच्या साध्वी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात. थंडी असो वा ऊन दिगंबर साधू कोणत्याही परिस्थितीत कपडे परिधान करत नाहीत. श्वेतांबर साधू आणि नन्स त्यांच्यासोबत असलेल्या 14 वस्तूंपैकी एक ब्लँकेट ठेवतात. हे ब्लॅंकेट फार पातळ असतं. तसेच, फक्त झोपतानाच ते या कपड्याने स्वत:ला झाकतात. 

मात्र, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दीक्षा घेतल्यानंतर जैन भिक्षू आणि साध्वी कधीही स्नान करत नाहीत. जैन धर्म मान्यतेनुसार, जर त्यांनी आंघोळ केली तर सूक्ष्मजीवांचे जीवन धोक्यात येईल. या कारणास्तव, ते कधीच आंघोळ करत नाही आणि नेहमी तोंडावर कापड ठेवतात.  

आंघोळ न करता स्वच्छ कसे राहतात? 

असे म्हटले जाते की, आंघोळीचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. बाह्य आणि अंतर्गत. सामान्य लोक सहसा पाण्याने आंघोळ करतात. परंतु जैन भिक्षू आणि भिक्षुणी मन आणि विचारांच्या शुद्धीकरणासह ध्यानात बसून अंतर्गत स्नान करतात. त्याचे स्नान म्हणजे भावनांचे शुद्धीकरण. ते आयुष्यभर हा नियम पाळतात. ठराविक दिवसांच्या अंतराने ते एक ओले कापड घेऊन त्या कपड्याने त्यांचे शरीर पुसतात. यामुळे त्यांचे शरीर नेहमीच ताजेतवाने दिसते. 

जैन भिक्षू सर्व प्रकारच्या भौतिक साधनांचा त्याग करतात आणि त्यांचे संपूर्ण जीवन अत्यंत साधेपणाने जगतात. परदेशात राहणारे जैन भिक्षू आणि भिक्षुणी देखील असेच कठीण जीवन जगतात. जैन समुदायाकडून त्यांना निवारा आणि अन्न पुरवले जाते. हे साधू आणि साध्वी जैन मंदिरांशी जोडलेल्या मठांमध्ये राहतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                       

Ketu Gochar 2025 : मे महिन्यात धनवान होतील 'या' 3 राशी, पुढचे दीड वर्ष श्रीमंतीत जगाल, केतू देणार अपार धनलाभ