Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथ यात्रेतील महाप्रसादाचं महत्त्व; 'हे' 4 नियम पाळा, सर्व पापांपासून मुक्ती मिळवा!

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रा हा फक्त एक पर्वच नाही तर एक पवित्र अनुभव आहे. यात्रेप्रमाणेच या यात्रेत मिळणाऱ्या प्रसादाचं देखील मोठं महत्त्व आहे.

Continues below advertisement

Jagannath Rath Yatra 2025 : सध्या सगळीकडे जगन्नाथ रथ यात्रेची चर्चा सुरु आहे. ओडिशातील पुरी येथे भरणारी ही रथयात्रा पाहण्यासाठी जगभरातून अनेक भक्त या ठिकाणी एकत्र जमतात. हा फक्त एक पर्वच नाही तर एक पवित्र अनुभव आहे. या दरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रेच्या रथाला खेचणं आणि त्यांचं दर्शन करण्याचा अनुभव भक्तांसाठी अद्वितीय आहे. असं म्हणतात की या यात्रेत एकदा सामील झाल्यास सर्व संकटांपासून सुटका होते. जगन्नाथ रथ यात्रेप्रमाणेच या यात्रेत मिळणाऱ्या प्रसादाचं देखील मोठं महत्त्व आहे. याच संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

जगन्नाथ रथ यात्रेतील प्रसादाचं महत्त्व 

जगन्नाथ रथयात्रेत मिळणाऱ्या प्रसादाला महाप्रसाद म्हणतात. कारण हा प्रसाद थेट भगवान जगन्नाथाला आधी चढवला जातो. असं म्हणतात की, हा प्रसाद खाल्ल्यास आपली सर्व पापं मिटतात. सुख-समृद्धी मिळते. हा प्रसाद फक्त शरीरालाच नाही तर आत्म्याला सुद्धा पवित्र करतो अशी मान्यता आहे. 

महाप्रसादाचं काय कराल? 

श्रद्धेने ग्रहण करा 

महाप्रसादाला नेहमीच श्रद्धेने ग्रहण करावे. हा प्रसाद खाताना भगवान जगन्नाथाचं ध्यान करावं. तसेच, हा प्रसाद घाईगडबडीत खाऊ नये. 

प्रसाद वाया घालवू नका 

हा प्रसाद एक प्रकारे देवाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे त्याचा एकही कण वाया जाऊ देऊ नका. प्रसाद जितका तुम्हाला हवा तितकाच तो घ्यावा. जर तो उरल्यास पशु-पक्ष्यांना खाऊ घालावा. 

लोकांमध्ये वाटा 

देवाचा महाप्रसाद कधीच एकट्यात खाऊ नये. तर, तो नेहमी कुटुंबातील लोकांमध्ये, मित्र-परिवारात वाटून खाल्ला पाहिजे. प्रसाद वाटून खाल्ल्याने देवाची आपल्यावर दुप्पट कृपा वाढते. 

गरजूंना द्या 

जर तुमच्याकडे महाप्रसाद शिल्लक राहिल्यास तो गरजूंना वाटावा. यामुळे तुम्हाला देखील मानसिक शांती मिळेल. तसेच, तुमच्या हातू पुण्याचं काम घडेल. 

प्रसादाचं काय करु नये? 

  • चुकूनही प्रसादाचा अपमान करु नका. 
  • प्रसादाला अपवित्र स्थानी ठेऊ नका. 
  • प्रसाद घाताना कोणतीच घमंड करु नका. 
  • स्वच्छ हाताने प्रसाद घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                             

Numerology : शनीदेवाची कृपा! वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; जगतात ऐटीत आणि राजेशाही थाटात

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola