HSC Exam Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मात्र, ज्याप्रमाणे दहावी-बारावीच्या निकालाला महत्त्व असतं. त्याचप्रमाणे बारावीनंतर करिअर कोणतं निवडायचं याबाबत सुद्धा अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात. यासाठीच, ज्योतिष शास्नानुसार, तुमच्या राशीनुसार कोणतं करिअर तुमच्यासाठी योग्य असेल आणि कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार करिअर कसं निवडायचं या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊयात. 

 

डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे ते जाणून घेऊयात. 

दहावी आणि बारावीनंतर शाखा निवडताना विचार करावा.


• बुध बलवान असल्यास - वाणिज्य, संप्रेषण (संवादकौशल्य), संगणकशास्त्र.

• गुरु बलवान असल्यास - उच्च शिक्षण, विज्ञान, अध्यापन, संशोधन.

• मंगळ बलवान असल्यास - अभियांत्रिकी, सैन्य, क्रिडाक्षेत्र.

• शुक्र बलवान असल्यास - कला, फॅशन, मीडिया, अभिनय.

• शनी बलवान असल्यास - प्रशासकीय सेवा, उद्योग, व्यवस्थापन.

 

राशी आणि करिअर निवड कशी करावी? 


 


मेष रास (Aries Horoscope) – मंगळ प्रभाव


- करिअर : सैन्य, पोलीस, खेळ, अभियांत्रिकी, उद्योग, तंत्रज्ञान, सर्जरी.

 


वृषभ रास (Taurus Horoscope) – शुक्र प्रभाव


- करिअर : कला, गायन, नृत्य, फॅशन डिझायनिंग, शेती, फायनान्स, हॉटेल मॅनेजमेंट.

 


मिथुन रास (Gemini Horoscope) – बुध प्रभाव


करिअर : पत्रकारिता, मीडिया, लेखन, मार्केटिंग, भाषाशास्त्र, आयटी, वाणिज्य.

 


कर्क रास (Cancer Horoscope) – चंद्र प्रभाव


- करिअर : डॉक्टरी, नर्सिंग, मानसशास्त्र, समाजसेवा, हॉटेल मॅनेजमेंट, शिक्षण.

 


सिंह रास (Leo Horoscope) – सूर्य प्रभाव


- करिअर : प्रशासकीय सेवा (IAS, IPS), अभिनय, नेत्याची भूमिका, व्यवस्थापन, सरकारी नोकरी.

 


कन्या रास (Virgo Horoscope) – बुध प्रभाव


- करिअर : वैद्यकीय क्षेत्र, लेखा, डेटा विश्लेषण, शिक्षण, संगणक विज्ञान, फार्मसी.

 


तूळ रास (Libra Horoscope) – शुक्र प्रभाव


- करिअर : लॉ, फॅशन डिझायनिंग, व्यापार, अभिनय, संगीत, सौंदर्य प्रसाधन उद्योग.

 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope) – मंगळ आणि केतू प्रभाव


- करिअर : सर्जरी, गुह्यशास्त्र, गुन्हे तपास, संशोधन, गुप्तचर सेवा, औषधनिर्माण.

 


धनु रास (Sagittarius Horoscope) – गुरु प्रभाव


- करिअर : प्राध्यापक, धार्मिक क्षेत्र, कायदा, प्रवास आणि पर्यटन, सॉफ्टवेअर क्षेत्र.

 


मकर रास (Capricorn Horoscope) – शनी प्रभाव


- करिअर : प्रशासन, इंजिनियरिंग, शेती, बांधकाम, सिव्हिल सर्व्हिसेस, फॅक्टरी व्यवस्थापन.

 


कुंभ रास (Aquarius Horoscope) – शनी आणि राहू प्रभाव


- करिअर : तंत्रज्ञान, संशोधन, विज्ञान, आयटी, सोशल मीडियासंबंधित व्यवसाय, एरोनॉटिक्स.

 


मीन रास (Pisces Horoscope) – गुरु प्रभाव


- करिअर : अध्यात्म, मानसोपचार, शिक्षण, चित्रकला, संगीत, संशोधन, मानसशास्त्र.

 

ज्योतिषशास्त्रानुसार विद्याभ्यास आणि करिअर निवडीसाठी काही प्रमुख ग्रह जबाबदार असतात. कोणत्या क्षेत्रात यश मिळू शकते हे ग्रहस्थितीनुसार ठरते.

 

- डॉ भूषण ज्योतिर्विद 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

 

हे ही वाचा : 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI