Horoscope Today, November 16, 2022 : बुधवारी, 16 नोव्हेंबर रोजी जेथे चंद्र सूर्याच्या सिंह राशीत येत आहे, तेथे सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत बुध, शुक्र आणि सूर्य हे तीन ग्रह वृश्चिक राशीत असतील. या ग्रहस्थितीमुळे कर्क आणि मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक बाबतीत चांगला राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीवर आधारित या दिवशी तुमचे तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही संधी आणि आव्हाने या दोन्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेषमेष राशीच्या लोकांना आज सरकारी किंवा खाजगी कामात यश मिळेल. कुटुंबात सुख-शांती राहील. मुलांचे शिक्षण किंवा करिअरबाबत चिंता असेल. अचानक काही खर्च येऊ शकतात, जे इच्छा नसतानाही करावे लागतील. सामाजिक कार्यात काम करताना नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात नवीन यश तुमची वाट पाहत आहे. वैवाहिक जीवन आनंदी होईल. खोकल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज 60 टक्के पर्यंत नशीब तुमच्या सोबत आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

वृषभवृषभ राशीचे लोकांचे जुने मतभेद आणि गैरसमज दूर होतील. अनोळखी लोकांशी संपर्क वाढवू नका. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. व्यवसायात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. जोडीदाराच्या तब्येतीत काही चढ-उतार होऊ शकतात. जास्त काम आणि मेहनतीचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. आज तुमचे भाग्य 85 टक्के असेल. गाईला हिरवा चारा द्यावा.

मिथुनमिथुन राशीचे लोक आज कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवतील आणि संभाषणातून समस्येवर तोडगा काढतील. यासोबतच एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होऊ शकते. तुम्ही आणि तुमच्या नातेवाइकांमध्ये सुरू असलेला वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवला जाऊ शकतो. बऱ्याच बाबतीत संयम आवश्यक आहे. राग आणि घाईमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. घर-कुटुंब आणि व्यवसायात योग्य समन्वय राहील. थकवा आणि तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.आज नशीब 80 टक्के तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मीची पूजा करा.

कर्ककर्क राशीचे लोकं एखादे विशेष काम पूर्ण झाल्यास आनंदी राहतील. विवाह इच्छुकांच्या लग्नासाठी चांगली स्थळं येऊ शकतात. वैयक्तिक कामात पूर्ण लक्ष द्या. आज तुम्हाला कामात यश मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तसेच अनावश्यक खर्चात कपात करा. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात क्षेत्राशी संबंधित कोणत्याही योजनेवर गांभीर्याने काम करा. पती-पत्नीमध्ये सुरू असलेले गैरसमज आणि मतभेद दूर होतील.नशीब आज 72 टक्के साथ देईल. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.

सिंहसिंह राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीचा पाठिंबा आणि योग्य सल्ला मिळेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. व्यवसायातील उलथापालथ आणि आर्थिक मंदीमुळे कुटुंबातील सदस्यांना खर्चात कपात करावी लागू शकते. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. व्यवसायात गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. आरोग्य उत्तम राहील. नशीब आज 72  टक्के सोबत असेल. गणेशजींना लाडू अर्पण करा.

कन्याकन्या राशीच्या लोकांसाठी कुटुंबातील सदस्यांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतील. आज तुम्ही त्या पूर्ण करू शकाल. आर्थिक कामांसाठी वेळ अनुकूल आहे. काही लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत नातेवाइकांशी व्यवहार करताना नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित तुमचे कोणतेही काम फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. नकारात्मक क्रियाकलाप आणि व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा. आज 84 टक्के पर्यंत नशीब तुमच्या सोबत आहे. शिव चालिसा पठण करा.

तूळतूळ राशीच्या लोकांना आज सकाळी एखाद्या महत्वाच्या कामाची माहिती मिळू शकते. त्याची तातडीने अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही वेळ जाईल. भविष्यासाठी नियोजन करताना तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. इतरांवर अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. आज उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मायग्रेनचा त्रास राहू शकतो. आज नशीब तुम्हाला 80 टक्के साथ देईल. देवी सरस्वतीची पूजा करा.

वृश्चिकआज इतर गोष्टींकडे लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बऱ्याच काळापासून सुरू असलेला तणाव दूर होऊ शकतो. काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंचा विचार करा. जमीन खरेदीशी संबंधित कामांमध्ये जास्त लाभाची अपेक्षा करू नका. अधिकच्या इच्छेमुळे नुकसान होऊ शकते. रागामुळे केलेले कामही बिघडू शकते. व्यवसायात क्षेत्राशी संबंधित योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या आरोग्याची नियमित तपासणी करा. आज 85 टक्के नशीब तुमच्या सोबत असेल. पांढऱ्या वस्तू दान करा.

धनुधनु राशीचे लोक घरातील कामात जास्त वेळ घालवतील. कोणत्याही महत्वाच्या कामात आळस करू नका. कधीकधी तुमचा संशयास्पद स्वभाव तुम्हाला आणि इतरांसाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे वेळेनुसार तुमच्या वागण्यात बदल करा. तुमच्या योजना आणि उपक्रम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कार्यालयात काम करणारी लोकं त्यांचे बॉस आणि अधिकारी यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवतील. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ जाईल. अत्यंत प्रदूषित आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आज 72 टक्क्यांपर्यंत नशीब तुमच्या सोबत आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करा.

मकरआज मकर राशीचे लोक जवळच्या व्यक्तीची समस्या सोडवू शकतील. आज तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. काही लोक तुमच्यासाठी समस्या बनू शकतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू नका. यावेळी काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात समन्वय राहील. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. तब्येत चांगली राहील. आज तुमचे नशीब 85 टक्के असेल. गणपतीला मोदक अर्पण करा.

कुंभआज कुंभ राशीच्या लोकांचा वेळ मनोरंजन आणि कुटुंबासोबत खरेदी यासारख्या कार्यात आनंदाने जाईल. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक केले जाईल. आर्थिक व्यवहाराबाबत विशेष सकारात्मक परिणाम दिसणार नाहीत. यामुळे चिडचिडेपणा आणि निराशेची भावना असेल. नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. व्यवसायातील प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित योजनांची माहिती मिळेल. पती-पत्नीमध्ये एखादा वाद असल्यास समस्येवर तोडगा काढू शकाल. पोटदुखीमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल.आज नशीब 90 टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खायला द्या.

मीनआज मीन राशीच्या लोकांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या समस्या दूर होतील. आज तुमच्या प्रियजनांसोबत बसा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. शेजाऱ्यांशी कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. जवळच्या व्यक्तीबद्दल एखादी दु:खद बातमी मिळाल्याने मन दुःखी राहील. व्यवसायाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पती-पत्नी एकमेकांच्या सामंजस्याने योग्य निर्णय घेतील. आज भाग्य तुम्हाला 85 टक्के साथ देईल. हनुमानजींना सिंदूर अर्पण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : या दोन गोष्टी माणसाला दुबळे बनवतात, जाणून घ्या गीतेमधील अनमोल विचार