Horoscope Today, June 11, 2022 : चंद्र तूळ राशीत आहे आणि स्वाती नक्षत्र आहे. सूर्य वृषभ राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि कुंभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांचा बहुतेक वेळ कौटुंबिक आणि पैशाशी संबंधित कामात जाईल. तर, वृषभ राशीच्या लोकांनी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : आज तुमचा बहुतेक वेळ कौटुंबिक आणि पैशाशी संबंधित कामात जाईल आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळतील. स्वतःवर जास्त जबाबदारी ओढवून घेऊ नका. वास्तवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मनोबल आणि आत्मविश्वास कायम ठेवा. व्यवसायातील कामे थोडी सोपी होतील. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा. आरोग्य उत्तम राहील.


वृषभ (Taurus Horoscope) : काही कामात व्यत्यय आल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. आहाराकडे लक्ष द्या, आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शैक्षणिक कामासाठी प्रवासाला जाऊ शकता.  कोणाशीही विनोद करणे टाळा. गैरसमज होऊ शकतो. मौजमजा आणि मनोरंजनाच्या मागे पैसा खर्च होईल.


मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. व्यवसायाच्या विस्तारासाठी आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, जीवनसाथीसोबत मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर पैसा खर्च होऊ शकतो. नोकरीत उत्पन्न वाढू शकते. घरामध्ये मंगल कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.


कर्क (Cancer Horoscope) :  एखाद्या विशिष्ट विषयावर जवळच्या नातेवाईकांशी बोलल्याने काही समस्या दूर होतील. काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. तुमचे बजेट लक्षात ठेवा. इतरांच्या कामात जास्त ढवळाढवळ करू नका. व्यवसाय योजना सुरू करण्याची संधी मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. आरोग्य उत्तम राहील नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल.


सिंह (Leo Horoscope) : कामातील अडथळे तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्हाला शैक्षणिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. सावध राहा, रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. व्यवसायात सामान्य लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. तुमचा स्वाभिमान दुखावल्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होण्याचे योग आहेत.


कन्या (Virgo Horoscope) : कामातील अडथळे तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. शैक्षणिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. सावध राहा, रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात सामान्य लाभ होईल. अनावश्यक खर्च होण्याचे योग आहेत. नोकरदारांसाठीही काळ अनुकूल राहील. विरोधकांवर विजय मिळेल. आज तुमचे जीवन साथीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.


तूळ (Libra Horoscope) : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. नवीन कपडे, दागिने किंवा मनोरंजनावर पैसा खर्च होईल. कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणे तुम्हाला कठीण जाईल. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळा. अहंकार बाजूला ठेवा आणि अनुकूल वातावरणात काम करा. कोणतेही काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन करता येईल. खर्च वाढल्याने आर्थिक स्थितीवर परिणाम होईल.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धार्मिक कार्यात रस घ्याल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. या राशीच्या व्यावसायिकांना आज मोठी भेट मिळू शकते. सावध राहा, रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत सावधपणे पुढे जावे लागेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.


धनु (Sagittarius Horoscope) : व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आनंदाचे वातावरण राहील. मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखाल. आर्थिक लाभ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या चुकीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायात भागीदाराशी संभाषण करताना संयम बाळगा. काही महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. वैयक्तिक कामांकडेही योग्य लक्ष द्या.


मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी नीट विचार करा. कोणाशीही वादात पडू नका. व्यवसायात मंदी असूनही आज तुम्हाला काही महत्त्वाच्या ऑर्डर मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीबाबत योजना बनवू शकता. छोट्या प्रवासाची शक्यता आहे. सरकारी कामे सहज पूर्ण होतील.


कुंभ (Aquarius Horoscope) : अनावश्यक धावपळ होईल. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. संध्याकाळपर्यंत अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना बनवू शकता. प्रवासासाठी पैसे खर्च होऊ शकतात. विरोधकांशी जास्त वादात किंवा चर्चेत पडू नये.


मीन (Pisces Horoscope) : आत्मविश्वास वाढेल. पालकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे कोणतेही अतिरिक्त स्त्रोत असल्यास आर्थिक स्थिती सुधारेल. जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :