Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 9 August 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज 9 ऑगस्ट 2026 रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या..

Horoscope Today 9 August 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 9 ऑगस्ट 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
तुमच्याशी स्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे अनेक व्यक्तींचे सहकार्य मिळेल त्यामुळे तुम्हाला समाधान जास्त मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे समाजात नावलौकिक मिळवाल महिला निस्पृह राहून काम करतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
बोलून दुसऱ्याला गार कराल नोकरी व्यवसायात तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने काम होईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
मागचा पुढचा विचार न करता फक्त काम करणे हे ध्येय तुमच्या पुढे राहील चलाखणी धू र्तपणाने वरिष्ठांची मने जिंकाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
डोकेदुखी किंवा त्वचा विकाराचे त्रास होऊ शकतात लेखन कलेतून प्रेरणा मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
वक्तृत्व कलेतून जवळच्या माणसांना आपलेसे कराल फायदा तोटा क्षणभर बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक दिसून येईल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे गरिबांची कणव येऊन त्यांना मदत कराल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
थोडा तापट स्वभाव सोडावा लागेल एखाद्या वेळी लोक तुम्हाला आतल्या गाठीचे म्हणून हिणवतील परंतु त्याकडे लक्ष न देता कामाकडे लक्ष द्या.
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
थोडा तापट स्वभाव सोडावा लागेल एखाद्या वेळी लोक तुम्हाला आतल्या गाठीचे म्हणून हिणवतील परंतु त्याकडे लक्ष न देता कामाकडे लक्ष द्या.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मी जिंकू शकतो हा सकारात्मक विचारच तुम्हाला कामात गती देणार आहे सर्व उद्दिष्टे साध्य करताना घराकडे मात्र दुर्लक्ष होऊ शकते.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
निरोगी विचाराच्या सानिध्यात निराशेचे मळक दाटून घेणार नाहीत हा विश्वास ठेवा महिलांनी उतावळेपणा करू नये.
मीन रास (Pisces Horoscope Today)
प्रत्येक वेळेचा सदुपयोग करून घ्याल स्वाभिमानी अहंकार यातील लक्ष्मण रेषा ओळखा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा चांगला की वाईट असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य



















