Continues below advertisement

Horoscope Today 8 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 8 नोव्हेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गैरमार्गाचा वापरकरता परिस्थितीला सामोरे जाण्यातच शहाणपणा आहे, हे आज लक्षात ठेवावे

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे हे लक्षात ठेवा, आज काही आवडीच्या गोष्टी सहज मिळून जातील

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज सर्वांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहील, एखादी मनासारखी गोष्ट घडेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज कलाकारांची चलती होईल, जोडीदाराकडून आर्थिक फायदे होतील

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये बरोबरीचा मित्र पुढे जातोय हे पाहून बंड करून उठाल आणि वरिष्ठांना जाबही विचाराल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज कोणालाही आश्वासन देताना त्याची पूर्तता करण्याकरता आवश्यक ती तरतूद करून ठेवा

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज एखाद्या तातडीच्या कामासाठी प्रवास करावा लागेल, महिला गोड बोलून कामे करून घेतील

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपण बरे नी आपले काम बरे, अशी मानसिकता ठेवल्यामुळे कामाचा dशा पाडाल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज इतरांच्या अनुभवातून शिकत असतानाही, स्वतःसाठीच अनुभव सूत्र स्वतःला तयार करावा लागेल

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज आपल्याच वेगाचं गतीचे दडपण आपल्यावर आणायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली तर चालण्याचं बळ टिकून राहील

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज काम करत असताना ताण येणे अपरिहार्य आहे, अशावेळी नाही म्हणायला शिकलात तर तो येणार नाही

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज नवीन कल्पना कशा राबवता येतील, याचा विचार आणि अंमलबजावणी करण्यामुळे देखील समाधानाचे क्षण मिळवाल

हेही वाचा

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, प्रेम, करिअर? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)