Horoscope Today 8 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 8 जानेवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये एक शिल्लक कारणावरून वाद विवाद झाले तरी, गोष्टी टोकाला नेऊ नयेत
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची गैर मर्जी झाली तरी डोके शांत ठेवावे लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी, नोकरीतील आजूबाजूचे वातावरण जरा तापलेलेच राहील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज आपले काम कर्तव्य म्हणून केले तर अडचणी येणार नाही, अतिउत्साह किंवा अतिनिराशा अशा दोन अवस्थेमध्ये राहाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिलांना इच्छापूर्तीसाठी फार कष्ट घ्यावे लागतील, तुमचा आळशीपणा आज नडेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज तुमच्या लहरी स्वभावाला जवळच्या लोकांना तोंड द्यावे लागेल, तुमच्यासमोर योग्य संधी आल्या तरी संशय घ्याल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज काम करण्यात अडथळे येऊ शकतात, परिस्थितीशी झगडण्यात मोठी शक्ती खर्च होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसायात स्थैर्य परिश्रमानेच मिळेल, घरामध्ये आणि घराबाहेरही नवीन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तरुणांना आवडत्या व्यक्ती भेटतील, त्यामध्ये आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडता येईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिलांचे अनेक गैरसमज होण्याची शक्यता, कामाच्या ठिकाणी दिशाभूल होऊ शकते
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, तर टोकाला जाऊ नये
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज अति धांदरटपणा नुकसान करू शकतो, महिलांनी तब्येतीला जपावे.
हेही वाचा
Makar Sankranti 2026: प्रतीक्षा संपली..यंदाची मकर संक्रात 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! सूर्याचे उत्तरायण होताच गोल्डन टाईम सुरू, कोण होणार मालामाल?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)