एक्स्प्लोर

Horoscope Today 8 February 2026 : आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 5 राशींना मिळणार पुण्य फळ; समोर आलेलं संकट टळेल, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 8 February 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 8 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 फेब्रुवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. तसेच, आज गजानन महाराज यांचा प्रकट दिनही आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या दिवशी भक्त शेगाव नगरीत जाऊन महाराजांचं दर्शन घेतात.  ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तसेच, जे लोक बेरोजगार आहेत त्यांना लवकरच चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी दिवसाची सुरुवात शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल जी तुमच्यामध्ये सकारात्मक बदल निर्माण करेल. राजकारणात तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं वर्तन तुमच्याप्रति चांगलं असेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. प्रामाणिकपणे आजचा दिवस जगाल. अनेक गोष्टी निरीक्षणातून तुम्हाला कळतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. काही महत्त्वाच्या योजना तुम्ही राबवाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, महत्त्वाची कामे तुमची वेळेत पूर्ण होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. अनेक आठवणींना उजाळा द्याल. तसेच, समाजात देखील तुम्हाला मान-सन्मान मिळेल. हाती घेतलेलं कार्य वेळेत पूर्ण कराल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय मिळेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. मात्र, व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवून काम करावं लागेल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. शेअर बाजारात तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच, राजकीय प्रकरणातही तुम्ही फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस भावनात्मक असणार आहे. आज तुम्हाला धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या हातून अनेक चांगले कार्य घडतील. तसेच, संध्याकाळ नंतरचा काळ फार इमोशनल असण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. पण, जसजसा दिवस पुढे जाईल तुमची घालमेल सुरु होईल. एखाद्या गोष्टीच्या सतत विचाराने तुमची मानसिक शांती भंग होईल. अशा वेळी योग आणि चिंतन करणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Gajanan Maharaj Prakat Din 2026 Wishes : अनंत कोटी, ब्रह्मांड नायक... गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला गुढी कशी तयार करावी? वाचा मंत्र, उपाय आणि गुढी उतरवण्याची वेळ
 गुढीपाडव्याला गुढी कशी तयार करावी? वाचा मंत्र, उपाय आणि गुढी उतरवण्याची वेळ
March 2026 Astrology: टेन्शन संपलं 3 राशींचं, 18 मार्चला 1..2 नाही, तब्बल 4 ग्रहांचं पॉवरफुल मिलन! पैसा, प्रगती डबल, श्रीमंतीचे योग बनतायत...
टेन्शन संपलं 3 राशींचं, 18 मार्चला 1..2 नाही, तब्बल 4 ग्रहांचं पॉवरफुल मिलन! पैसा, प्रगती डबल, श्रीमंतीचे योग बनतायत...
Shadashtak Yog 2026: आणखी एक संकट 4 राशींसमोर आ वासून उभं? 15 मार्चला ग्रहांचा विनाशकारी षडाष्टक योग, पैसा आरोग्य सांभाळा, ज्योतिषींचा इशारा..
आणखी एक संकट 4 राशींसमोर आ वासून उभं? 15 मार्चला ग्रहांचा विनाशकारी षडाष्टक योग, पैसा आरोग्य सांभाळा, ज्योतिषींचा इशारा..
Shani Ast 2026 : शनि-मंगळ-बुध ग्रह एकापाठोपाठ होणार अस्त! 'या' 3 राशींसाठी सर्वात कठीण काळ सुरु, उरले अवघे 24 तास...
शनि-मंगळ-बुध ग्रह एकापाठोपाठ होणार अस्त! 'या' 3 राशींसाठी सर्वात कठीण काळ सुरु, उरले अवघे 24 तास...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget