Continues below advertisement

Horoscope Today 7 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 जानेवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज व्यवहारापेक्षा हृदयाची भाषा तुम्हाला जास्त लवकर समजेल.

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये तुमच्या बरोबरीचे लोक पुढे गेलेले पाहताना जरा जास्तच त्रास होईल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल, त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज लोकांच्या संपर्कांमधून बरंच काही साधून जाल, संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल, कष्टाला सीमा राहणार नाही त्यामुळे थकून जाल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज नव्या वर्षाची सुरुवात बेधडक उत्साहाने कराल, परंतु तुमच्या स्वभावाचा फायदा घेणारे लोक तुम्हाला भेटतील

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील, काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होण्याची शक्यता

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल, त्यासाठी कर्जावर रक्कम मिळण्यासाठी आवश्यक ती तरतूद केल्यास कर्ज मिळू शकेल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अशा संधी मिळतील, वरिष्ठ दर्जाच्या अधिकारी असलेल्या लोकांमध्ये उठबस होईल

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज हाताखालच्या लोकांकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न करा, कुटुंबात सामंजस्य राहील

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये हलकेफुलके वातावरण राहील, महिलांनी आपल्या करिअरचा विचारा अवश्य करावा

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आजच्या स्पर्धेच्या जगात तुमचा निभाव लागण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील.

हेही वाचा

Lord Ganesh: संकटातून अलगद बाहेर काढतात! गणपती बाप्पाच्या 5 सर्वात प्रिय राशी, अडचणींना फिरकू देत नाही, संपत्ती, समृद्धीचे धनी बनवतात..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)