Horoscope Today 7 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 एप्रिल 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेश आणि हनुमानाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस कुटुंबात समाजात तुम्हाला लोक मान देतील, कर्माला बुद्धीची ताकद मिळेल आणि कामे लवकर पूर्ण होतील  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत व्यवहाराला जास्त महत्त्व द्याल, महिला व विद्यार्थ्यांना संयम पाळण्याचे फळ मिळेल  

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस विमा एजंट फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदेशीर दिवस जाईल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस शिस्त आणि वेळेचे बंधन पाळावे लागेल, आर्थिक घडी चांगली बसेल  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस नवीन घर घेणे किंवा व्यवहारांमध्ये अडचणी येतील, पचनशक्ती बिघडण्याची शक्यता असल्यामुळे पचेल ते खाणे हितावह ठरेल  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस वातप्रकृतीच्या माणसांना त्रास होऊ शकतो, व्यवसायात हाताखालच्या कामगारांचे प्रश्न सोडवताना नाकी दम येतील  

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस जवळच्या लोकांच्या अवास्तव मागण्या सामोपचाराने सोडवाव्या लागतील, स्पर्धेलाही तोंड द्यावे लागेल  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस लोकांशी संपर्क वाढेल, त्यात भेटणाऱ्या माणसांचा फायदा करून घ्यावा  

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आज महिलांनी मानापमानाच्या कल्पनांना जास्त महत्त्व देऊ नये, घरामध्ये धार्मिक कार्यामध्ये आनंदाने सहभागी व्हाल  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस खूप कष्ट पडतील, परंतु त्या कष्टाचे आज चीज होईल, महत्त्वाचे निर्णय घेताना गंभीर निश्चय व धोरणी बनाल  

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये अडकतील, कोणत्याही कागदपत्रांमध्ये काही अडचणी येत असतील तर, स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे मार्गे लागतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस आर्थिक घडी व्यवस्थित बसेल, जोडीदाराची महत्त्वाची कामे होतील, ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी पथ्य पाणी पाळावे.

ही वाचा

Numerology: प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)