Horoscope Today 6 February 2026: आज 6 फेब्रुवारीचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारणार, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 6 February 2026: आज शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 6 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 6 फेब्रुवारी 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज मित्र मंडळाचे उत्तम सहकार्य मिळेल, एखादे काम करून घ्यायचे असेल तर, मोठ्या लोकांच्या ओळखीने काम करून घ्यावे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्वतः तर आनंदी राहालच. परंतु जेथे जाल तेथे आनंद निर्माण कराल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहाल. त्यामुळे ज्येष्ठ मंडळी तुमच्यावर खुश राहतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये प्रगती होऊन आपले प्रस्ताव ज्येष्ठांसमोर मांडायला हरकत नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज एकंदरीत मन खुश ठेवणारा दिवस, महिलांना संतती सौख्य लाभेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींचा सहवास मिळेल, त्यांच्या सहकार्याने बरीच कामे मार्गी लागतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांचा खेळ मिळत अभ्यास होईल, व्यापारात आर्थिक लाभ झाल्यामुळे मागील बरीच देणे देता येतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे प्रसंग येतील, त्यातून आर्थिक लाभही होऊ शकतात
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कष्ट जास्त पडतील, तरच यश पदरात पडेल, राजकारणात पुढाकाराने अनेक गोष्टी कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज लोकांच्या पसंतीला उतरणार आहात, मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे वाद होऊ शकतात
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज काहीतरी कमतरता आहे असे सतत जाणवत राहील, काही गुप्त गोष्टी करण्याकडे कल राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज उष्णतेच्या विकारापासून सावधानता बाळगावी, महिलांना थोडे जास्त श्रम पडतील.
हेही वाचा
Surya Grahan 2026: अरे देवा..2026 चं पहिलं सूर्यग्रहण शनिच्या राशीत होतंय, 3 राशींनो ताकही फुंकून प्या, संकटाचा डोंगर? ज्योतिषींचा इशारा...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















